Happy Birthday Bipasha Basu : बॉलिवूडच्या सुंदर सुंदरींपैकी एक असलेल्या बिपाशा बसूचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत झाला. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या बिपाशाला चित्रपटात येण्यापूर्वी डॉक्टर व्हायचे होते. बिपाशाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला डॉक्टर बनायचे होते पण ती मॉडेलिंगच्या जगात आली आणि तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. तिच्या सावळ्या रंगामुळे बिपाशाला लहानपणी लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले होते.
२००१मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या बिपाशाने काही काळापूर्वी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले होते, ‘जेव्हा मी मोठी होत होते, तेव्हा मी अनेकदा ऐकले होते की बोनी सोनीच्या तुलनेत सावळी आहे. ती जरा जास्तच सावळी आहे ना? माझी आई सुद्धा एक गव्हाळ सुंदरी होती आणि मी तिच्यासारखीच दिसत होते. पण, माझे नातेवाईक याबद्दल का चर्चा करतात, हे मला कधीच कळले नाही. मी १५ वर्षांची असताना मॉडेलिंगला सुरुवात केली. मी सुपरमॉडेल स्पर्धा जिंकले. प्रत्येक वृत्तपत्रात बातमी होती की, कोलकात्याची एक सावळी मुलगी विजेती ठरली. मी मग विचार केला की, माझ्या नावा पुढे प्रत्येकवेळी सावळी का लागले जात आहे? मग मी मॉडेलिंग करण्यासाठी न्यूयॉर्क आणि पॅरिसला गेलो आणि मला जाणवले की माझ्या त्वचेच्या रंगामुळे मला येथे जास्त काम मिळते आणि लोकांचे लक्ष वेधले जाते.’ बिपाशाने तिच्या गडद रंगामुळे मॉडेलिंगच्या अनेक ऑफर नाकारल्या होत्या.
बिपाशा बसूने २००१ मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर २००२मध्ये बिपाशाने थ्रिलर चित्रपट 'राझ'मध्ये काम केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. २००३मध्ये रिलीज झालेला ‘जिस्म’ हा चित्रपट बिपाशाच्या करिअरमधील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. बिपाशाचे इतर प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘मेरे यार की शादी है’, ‘चोर मचाये शोर’, ‘गुनाह’, ‘ऐतबार’, ‘नो एंट्री’, ‘फिर हेरा फेरी’, ‘कॉर्पोरेट’, ‘ओंकारा’, ‘रेस’ आणि ‘रेस २’. इतकंच नाही तर, ‘डर सबको लगता है’ या टीव्ही सीरियलमध्येही तिने होस्टची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपटांसोबतच बिपाशाने तेलुगू, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
आजवरच्या कारकिर्दीत बिपाशा बसूचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिचे नाव अभिनेता डिनो मोरियासोबत जोडले गेले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि काही दिवसांनी ते वेगळे झाले. डिनोनंतर बिपाशाचे नाव जॉन अब्राहमसोबत जोडले गेले. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर होते, परंतु काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. यानंतर तिचे नाव हरमन बावेजासोबत जोडले गेले. यानंतर २०१६मध्ये राणा दग्गुबतीसोबत देखील तिचे नाव जोडले गेले. मात्र, बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. करणचे हे तिसरे लग्न होते. बिपाशाचे हे पहिले लग्न होते. बंगाली रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले.
संबंधित बातम्या