मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagyashree Birthday: प्रेमासाठी सलमानच्या अभिनेत्रीने राजघराण्याचा ऐशोआरामही सोडला! वाचा भाग्यश्रीबद्दल...

Bhagyashree Birthday: प्रेमासाठी सलमानच्या अभिनेत्रीने राजघराण्याचा ऐशोआरामही सोडला! वाचा भाग्यश्रीबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 23, 2024 07:51 AM IST

Happy Birthday Bhagyashree: भाग्यश्रीला सलमान खानसोबतच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे रातोरात स्टारडम मिळाले होते. भाग्यश्रीही एका राजघराण्याची राजकुमारी आहे.

Happy Birthday Bhagyashree
Happy Birthday Bhagyashree

Happy Birthday Bhagyashree: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री भाग्यश्री आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. नुकतीच ती सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. आज म्हणजेच २३ फेब्रुवारीला भाग्यश्री तिचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीला सलमान खानसोबतच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाद्वारे रातोरात स्टारडम मिळाले होते. भाग्यश्रीही एका राजघराण्याची राजकुमारी आहे. अभिनेत्रीचा जन्म १९६९मध्ये मुंबईत माधवराव आणि राज्य लक्ष्मी पटवर्धन यांच्या घरी झाला.

इतकंच नाही तर, भाग्यश्रीचे वडील विजयसिंगराव माधवराव पटवर्धन आजही ‘सांगलीचा राजा’ म्हणून ओळखले जातात. राजघराण्यातील असूनही, भाग्यश्रीने अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. पहिल्याच चित्रपटातून तिने यश मिळवले. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून स्टार बनलेल्या भाग्यश्रीने १९९०मध्ये तिचा जुना मित्र हिमालय दासानी याच्याशी लग्न केले. या लग्नाला भाग्यश्रीच्या घरच्यांचा या लग्नाला कडाडून विरोध होता. मात्र, सगळ्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने पळून जाऊन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Tharala Tar Mag 22nd Feb: चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा होणार खडाजंगी; साक्षीच्या येण्याने ऑफिसमध्ये गोंधळ

लग्नानंतर सोडले चित्रपट

पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार बनूनही, भाग्यश्रीने केवळ बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट केले. तिने लग्नानंतर चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. भाग्यश्रीनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. मात्र, त्या सर्व ऑफर नाकारून तिने गृहिणी होण्याचा निर्णय घेतला. एकदा भाग्यश्री 'मैने प्यार किया' चित्रपटादरम्यान को-स्टार सलमान खानला मिठी मारून रडू लागली. जेव्हा तिला याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा अभिनेत्रीने म्हणाली की, ती एका रूढिवादी कुटुंबातून आली आहे आणि काही दृश्यांमध्ये ती कम्फर्टेबल नाही.

पती-पत्नीने मिळून केले चित्रपट

'मैने प्यार किया'चे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात एक किसिंग सीन द्यायचा होता, पण दोन्ही कलाकारांनी हा सीन शूट करण्यास नकार दिला. त्यामुळे दिग्दर्शकाला हा सीन चित्रपटातून काढून टाकावा लागला. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांनीही अभिनयात नशीब आजमावले. भाग्यश्री आणि हिमालय यांनी 'त्यागी', 'कैद में हैं बुलबुल' आणि 'पायल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, ते सगळे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. भाग्यश्रीचा पती हिमालय दसानी याला २०१९मध्ये जुगाराचे रॅकेट चालवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

IPL_Entry_Point

विभाग