Avadhoot Gupte Birthday: श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील होता स्पर्धक!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avadhoot Gupte Birthday: श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील होता स्पर्धक!

Avadhoot Gupte Birthday: श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील होता स्पर्धक!

Feb 19, 2024 08:03 AM IST

Happy Birthday Avadhoot Gupte: आजघडीला अवधूत गुप्ते अनेक शोमध्ये परीक्षक म्हणूनही झळकतो. मात्र, एक काळ असा होता जेव्हा, तो परीक्षकांसमोर उभं राहून गाणी सादर करायचा.

Happy Birthday Avadhoot Gupte
Happy Birthday Avadhoot Gupte

Happy Birthday Avadhoot Gupte: ‘मोरया मोरया’ असो वा ‘तुझे देख के मेरी मधुबाला’... ही गाणी ऐकल्यावर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे गायक-संगीतकार अवधूत गुप्ते. आपल्या दमदार आवाजाने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा गायक म्हणून अवधूत गुप्ते याचं नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ गाण्याचं गायनचं नाही, तर त्याचं संगीत देखील खूप गाजलं.आपल्या आवाजाने मनोरंजन विश्वावर राज्य करणारा अवधूत गुप्ते कधीकाळी स्वतः देखील एका सिंगिंग शोचा स्पर्धक होता. अवधूत गुप्ते याने देखील आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही विश्वापासून केली होती. आज (१९ फेब्रुवारी) अवधूत गुप्ते त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे.

आजघडीला अवधूत गुप्ते अनेक शोमध्ये परीक्षक म्हणूनही झळकतो. मात्र, एक काळ असा होता जेव्हा, तो परीक्षकांसमोर उभं राहून गाणी सादर करायचा. गायक अवधूत गुप्ते याने ‘सारेगमप’च्या हिंदी पर्वात सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अनेक आठवणी तो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसतो. ‘सारेगमप’ या शोने अवधूत गुप्ते याला खरी ओळख मिळवून दिली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या शोचा स्पर्धक म्हणून स्टेजवर उभं राहण्यापासून ते याच शोचा परीक्षक बनून खुर्चीत बसण्याचा त्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. यश मिळवण्यासाठी संघर्ष कुणालाही चुकला नाही, तेच अवधूतच्या बाबतीतही घडलं होतं.

Kushal Badrike: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

१९९६मध्ये अवधूत गुप्ते होता स्पर्धक

अवधूत गुप्ते १९९६मध्ये ‘सारेगमप हिंदी’ शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सोनू निगम सांभाळत होता. १९९६ साली पार पडलेल्या ‘सारेगमप हिंदी’ या शोचा विजेता अवधूत गुप्ते ठरला होता. या शोच्या काही आठवणी अवधूत गुप्ते याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्या होत्या. या शोमधील आपल्या सादरीकरणाचा व्हिडीओ शेअर करत, कॅप्शनमधून त्याने आपल्या आठवणींना उजाळा दिला होता.

काय म्हणालेला अवधूत गुप्ते?

‘सारेगम’ हिंदीच्या पार्वतील एक व्हिडीओ शेअर करत अवधूत गुप्ते याने लिहिले की, ‘बऱ्याचदा लोक विचारतात की, परिक्षकाच्या खुर्चीत बसूनसुद्धा स्पर्धकांप्रती इतकी आत्मीयता आणि खेळकरपणा कसा काय टिकवून ठेवू शकतोस? तर, त्याचं उत्तर एवढंच की मी जेव्हा स्पर्धक होतो तेव्हा स्टेजवर गायला जाण्याआधीची छातीतली धडधड, पोटातला खड्डा, उघड्या डोळ्यांमधले स्वप्न आणि माघारी कौतुकासाठी पाणावलेले आईचे डोळे मी कधीच विसरलो नाही.. आणि मेंदूला ते विसरु देत नाही! त्यातून कधी विस्मरण झालेच तर हा व्हिडीओ बघतो. तुम्ही सुद्धा पहा आणि मी कधी विसरतो आहे असं तुम्हाला वाटलं, तर मलाच दाखवा! ता. क. - तो मधेच बाईच्या आवाजात "और" म्हणणारा चावट मुलगा म्हणजे सोनूजी!’

Whats_app_banner