वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली! वाचा अभिनेत्याविषयी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली! वाचा अभिनेत्याविषयी

वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली! वाचा अभिनेत्याविषयी

Jun 19, 2024 08:30 AM IST

वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. या अभिनेत्याचे लग्न रुपाली बर्वाशी झाले आहे, जी मूळची आसामची आहे.

वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली!
वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा प्रेमात पडले होते आशिष विद्यार्थी; लग्नगाठही बांधली!

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी आज (१९ जून) त्यांचा ६२वा वाढदिवस साजरा करत आहे. आशिष विद्यार्थी केवळ बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. तर, त्यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, उडिया, बंगाली आणि मराठीसह हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण घेतलेले आशिष विद्यार्थी काही वर्षांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. आशिष विद्यार्थी एक अप्रतिम अभिनेता आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली आहे. यासोबतच तो 'आर्ट वन' नावाच्या थिएटर ग्रुपमध्येही सामील झाले होते, जिथे त्याने आपल्या अभिनय कौशल्यात सुधारणा करण्यासाठी अनेक थिएटर नाटके सादर केली.

वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा पडले प्रेमात!

वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा प्रेमात पडले आणि त्यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. या अभिनेत्याचे लग्न रुपाली बर्वाशी झाले आहे, जी मूळची आसामची आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटोही व्हायरल होत असतात. दरम्यान, अभिनेता पत्नी रुपालीसोबत हनिमूनला देखील गेले होते, ज्याची एक झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. यामुळे अभिनेते ट्रोल देखील झाले होते.

कधीकाळी बॅकग्राउंड डान्सर होती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी

वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे आशिषला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात होते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत या विषयी बोलताना ते म्हणाले होते की, ‘मी सोशल मीडियावर म्हातारा, वेडा असे इतर अनेक अश्लील शब्द स्वतःसाठी वाचले. मजेशीर गोष्ट अशी आहे की, जो असे शब्द बोलतोय, तो स्वतःही कधीतरी या वयात येईलच. आणि हे माहित असूनसुद्धा ते लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांचा अपमानही करत आहेत. जणू ते स्वतःलाच अर्वाच्य म्हणत आहेत. म्हातारे झालाट म्हणून दुसरे लग्न करू नका? याचा अर्थ तुम्ही दुःखी मरावे का? जर एखाद्याला कोणाच्या आधाराची गरज असेल, तर ते का होऊ शकत नाही?’ असा सवाल त्यांनी केला होता.

सुपरवायझर म्हणून काम करणारा साईनाथ माने झाला सिनेमॅटोग्राफर! ‘अ व्हॅलेंटाईन डे’चा किस्सा सांगताना म्हणाला...

या चित्रपटांमध्ये झळकलेत आशिष विद्यार्थी!

आशिष विद्यार्थी अखेर ‘राणा नायडू’ या क्राईम वेब सीरिजमध्ये दिसले होते. यात व्यंकटेश दग्गुबाती, राणा दग्गुबती, सुचित्रा पिल्लई, गौरव चोप्रा आणि सुरवीन चावला यांची भूमिका होती. प्रशांत नायर लिखित, केविन लुपेरचियो लिखित आणि प्रशांत नायर आणि रणदीप झा दिग्दर्शित नेटफ्लिक्स सीरिज ‘ट्रायल बाय फायर’मध्येही आशिष यांनी उत्तम काम केले होते.

आशिष विद्यार्थी 'बिच्छू', 'जिद्दी', 'अर्जुन पंडित', 'वास्तव', 'बादल' अशा अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत ११ भाषांमधील ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी १९९५ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

Whats_app_banner