बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप हा ओळखला जातो. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुरागने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाची एक वेगळीच चर्चा रंगलेली असते. तो नेहमीच ऑफबीट चित्रपटासाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांव्यक्तीरिक्त स्पष्टवक्ता शैलीसाठी देखील तो ओळखला जातो. आज १० सप्टेंबर रोजी अनुराग कश्यपचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा जन्म १० सप्टेंबर १९७२ साली उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे झाला. आज अनुराग त्याच्या हटके चित्रपटांसाठी विशेष ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट तुफान हिट झाले आहेत. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिश्यात केवळ पाच हजार रुपये होते. त्यामुळे मुंबईत स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनुरागला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच खासगी आयुष्य देखील कायम चर्चेत असते.
अनुरागला लहानपणापासून शास्त्रज्ञ व्हायचे होते. ग्वालियर येथे शिक्षण घेतल्यानंतर तो दिल्लीला आला. त्याने दिल्ली विद्यापिठातून झूलॉजी केली. १९९३ साली त्याने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. त्यानंतर त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याला अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनुरागने १० दिवसात ५५ चित्रपट पाहिले होते.
१९९३ साली अनुराग पाच हजार रुपये घेऊन मुंबईला आला होता. पण जेव्हा खिश्यातील पैस संपले तेव्हा त्याने समुद्र किनारी, मुंबईच्या रस्त्यावर दिवस काढले. खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने पृथ्वी थिएटरमध्ये काम मिळवले. पण त्याचे पहिले नाटक सर्वांसमोर आलेच नाही. कारण त्या नाटकाच्या दिग्दर्शकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अनुरागची ओळख शिवम नायरशी झाली. त्यांनी अनुरागची श्रीराम राघवन यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर त्याने हंसल मेहता यांच्या एका चित्रपटासाठी काम केले. १९९८ साली मनोज वाजपेयीने अनुरागचे नाव राम गोपाल वर्मा यांना सुचवले. राम गोपाल वर्माला अनुरागचे काम आवडले. त्यानंतर त्यांनी सत्या चित्रपटात एकत्र काम केले आणि हा चित्रपट हिट ठरला.
वाचा: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?
अनुरागचा पहिला चित्रपट पांच होता. या चित्रपटाची कथा पाच मित्रांवर आधारित होती. हे मित्र रॉक बँड चालवत होते. पण त्यांच्यासोबत असे काही घडते की ते क्रिमिनल बनतात. पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शितच होऊ शकला नाही. आज अनुराग बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
संबंधित बातम्या