Anupam Kher Birthday: अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर यांनी सोडलं होतं घर! तुम्हाला माहितीय का ‘हा’ किस्सा?-happy birthday anupam kher know about veteran actor anupam kher s struggle story ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anupam Kher Birthday: अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर यांनी सोडलं होतं घर! तुम्हाला माहितीय का ‘हा’ किस्सा?

Anupam Kher Birthday: अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर यांनी सोडलं होतं घर! तुम्हाला माहितीय का ‘हा’ किस्सा?

Mar 07, 2024 07:46 AM IST

Happy Birthday Anupam Kher: अभिनेता अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे.

Happy Birthday Anupam Kher
Happy Birthday Anupam Kher

Happy Birthday Anupam Kher: अनुपम खेर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. अनुपम खेर आज (७ मार्च) त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुपम खेर यांनी तब्बल ५००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ हिंदीच नव्हे तर, त्यांनी इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी शिमल्यातील एका काश्मिरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पुष्करनाथ खेर हे वनविभागात लिपिक होते. तर, त्यांची आई दुलारी खेर या गृहिणी आहेत.

अभिनेता अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. केवळ ३७ रुपये घेऊन ते घरून ‘स्वप्नांची नगरी’ मुंबईकडे रवाना झाले होते. एका मुलाखतीत स्वतः अनुपम खेर यांनी सांगितले होते की, त्यांनी अनेक रात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून घालवल्या होत्या. मुंबईत आल्यावर तब्बल ३ वर्ष अनुपम खेर यांना काहीच काम मिळाले नव्हते. पण, एकदा कामनंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

Madness Machayenge Actress: कुशल बद्रिकेसोबत ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये धिंगाणा घालणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री!

'सारांश'मधून केली अभिनयाची सुरुवात

१९८४मध्ये अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्या 'सारांश' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तरुण असणाऱ्या अनुपम खेर यांनी एका वृद्ध वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अनुपम खेर यांनी ‘मिसाल’, ‘कर्मा’, ‘त्रिदेव’, ‘राम लखन’, ‘दिल’, ‘शोला और शबनम’, ‘बेटा’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हसीना मान जाएंगी’, ‘विवाह’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

लहानपणी खूप खोडकर होते अनुपम!

अनुपम खेर लहानपणापासूनच खूप खोडकर होते. त्यांच्या खोडसाळपणामुळे त्यांचे कुटुंब हैराण व्हायचे. कित्येकदा आई दुलारी खेर यांनी रागाने त्यांना फटकेही दिले होते. एकदा त्यांच्या आईने त्यांना रागाच्या भरात विवस्त्र अवस्थेत घरातून हाकलून दिले होते. अनुपम खेर यांनी एकदा त्यांच्या बालपणातील एक किस्सा सांगितला होता. एकदा त्यांच्या आईने त्यांना शाळेच्या फीसाठी पैसे दिले होते. मात्र, अनुपम यांनी त्यातील काही पैसे साठवून बॅगेत लपवले होते. जेव्हा आईला त्यांच्या बॅगेतून पैसे सापडले, तेव्हा तिला खूप राग आला. त्यावेळी आई दुलारी यांनी अनुपम यांना रागाने फटके तर दिलेच, पण विवस्त्र करून घराबाहेर देखील काढले होते.

Whats_app_banner
विभाग