Happy Birthday Amrita Singh: बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिह आज (९ फेब्रुवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी अभिनेत्री असलेली अमृता सिंह, सैफ अली खानशी लग्न झाल्यानंतर आता सैफ अली खानची माजी पत्नी आणि सारा अली खानची आई म्हणून ओळखली जाते. पण, एक काळ असा होता, जेव्हा अमृता सिंह इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री होती. वयाच्या ३४ व्या वर्षी तिने सैफ अली खानशी लग्न केले. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. १३ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे वेगळे झाले. अमृता सिंह हिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी...
अभिनेत्री अमृता सिंहचा जन्म शीख कुटुंबात झाला होता. राजकीय कार्यकर्त्या रुखसाना सुलताना आणि लष्करी अधिकारी शिविंदर सिंह विर्क यांच्या घरी अमृताचा जन्म झाला. अमृता सिंह ही लोकप्रिय कादंबरीकार खुशवंत सिंह यांची भाची आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या व्यक्तींशी तिचे जवळचे संबंध आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अमृता सिंह बेली डान्सर होती. अमृता सिंहने १९८३मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी देओलसोबतचा तिचा हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. ‘बेताब’नंतर अभिनेत्री म्हणून अमृतासाठी बॉलिवूडची दारं खुली झाली.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची पहिली भेट राहुल रवैलच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात सैफ आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. सैफ अली खान अभिनेत्री अमृता सिंहला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी सैफ अली खान त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता, तर अमृता सिंह ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांनी आपल्याला नात्याला पुढे नेण्याच्या निर्णय घेत सगळ्यांनाच धक्का दिला होता. अमृताचे आई-वडील तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या पुरुषाशी तिचे लग्न लावायला तयार नव्हते. त्यावेळी सैफ अली खानला फारसे कुणी ओळखतही नव्हते. मात्र, सगळ्यांचा विरोध पत्करून ऑक्टोबर १९९१मध्ये, दोघांनी एका भव्य समारंभात लग्नगाठ बांधली होती. अमृता सिंहने प्रेमविवाह करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. अमृता आणि सैफ लग्नानंतर १३ वर्षे एकत्र राहत होते. मात्र, २००४मध्ये दोघांनी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खानची इटालियन डान्सर रोजा कॅटालानोशी असलेली जवळीक हेच त्याचे लग्न तुटण्याचे कारण असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. घटस्फोटानंतर अमृता सिंहने तिचे संपूर्ण लक्ष मुलांच्या संगोपनावर केंद्रित केले होते. काही काळाच्या ब्रेकनंतर, अमृता सिंह ‘२ स्टेट्स’, ‘फ्लाइंग जट’ आणि ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर परतली.
संबंधित बातम्या