Happy Birthday Amey Wagh : मराठी चित्रपटसृष्टीचा लाडका ‘चॉकलेट बॉय’ अमेय वाघ आज (१३ नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अमेयवर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमेय वाघ याने आपल्या अभिनयाने नेहमीच सगळ्यांना भुरळ घातली आहे. पण, यासोबतच अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांची लव्हस्टोरी देखील अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे. अभिनेत्याने लग्नाची घोषणा केल्यानंतर अमेयच्या चाहत्यांमध्ये जरा निराशा निर्माण झाली होती. कारण तो तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून ओळखला जात होता. पण, त्याने साजिरीसोबत विवाहबंधनात अडकल्यावर या दोघांची प्रेमकथा चर्चेत आली होती.
अमेय आणि साजिरी यांचा भेटीचा पहिला क्षण अतिशय रोमांचक आणि थोडा गोंधळलेला होता. दोघेही पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत होते. अमेय वाघ तेव्हा नाटक आणि एकांकीकेमध्ये काम करत होता, तर साजिरी नाटकाची तालीम पाहायला येत होती. त्यावेळीच साजिरीला अमेयवर प्रेम बसले आणि तिने त्याला भेटण्यासाठी निरोप पाठवला. अमेय त्या भेटीला तयार देखील झाला, पण तो त्यावेळी एक नाटक स्पर्धेत सहभागी झाला होता. त्या स्पर्धेसाठी बाहेर जायचं असल्याने, त्याने तिला ‘नंतर सांगतो’ असे आश्वासन दिले.
तथापि, काही महिने उलटून गेल्यानंतरही अमेयने साजिरीला कोणतंही उत्तर दिलं नाही. साजिरीने वैतागून त्याला विचारलं, ‘तुझं उत्तर काय आहे? तू उत्तर देणार आहेस का?’. त्यावेळी अमेयने ‘नाही’ असं उत्तर दिलं. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने साजिरीला सरप्राईझ देत ‘हो’ म्हटलं. याच क्षणापासून त्यांचं प्रेम फुलू लागलं आणि १३ वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांनी २ जून २०१७ रोजी विवाहाचा निर्णय घेतला. पारंपारिक मराठी पद्धतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विवाहसोहळ्यात दोघांचा विवाह पार पडला. त्यांच्या या १३ वर्षांच्या प्रेमकथेला लग्नाच्या रूपाने अखेर एक आयुष्याची वाट मिळाली. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि इतर जवळचे लोक उपस्थित होते. विवाहसोहळ्याच्या त्या खास क्षणात, अमेय आणि साजिरीच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद दिसला.
अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांचा हा प्रवास एक प्रेरणा आहे. त्यांचे प्रेम आणि समर्पण, तसेच त्यांची एकमेकांबद्दलची भावनात्मक जोड, यामुळे अनेक लोकांना त्यांच्या प्रेमाचं मोल असलेली गोष्ट कळली. साजिरी चित्रपटसृष्टीचा भाग नसली तरी तिचा आणि अमेयचा जोडा खूप खास आहे.