Aamir Khan Birthday: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दलचे ‘हे’ किस्से ऐकलेयत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan Birthday: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दलचे ‘हे’ किस्से ऐकलेयत का?

Aamir Khan Birthday: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबद्दलचे ‘हे’ किस्से ऐकलेयत का?

Updated Mar 14, 2024 07:46 AM IST

Happy Birthday Aamir Khan: आमिर खान हा बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. या वयातही तो खूप उत्साही राहतो आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतो.

Happy Birthday Aamir Khan
Happy Birthday Aamir Khan

Happy Birthday Aamir Khan: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आज त्याचा ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खान हा बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. या वयातही तो खूप उत्साही राहतो आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतो. आपल्या कामासाठी तो अत्यंत समर्पित असतो. अभिनेता असण्यासोबतच आमिर खान दिग्दर्शक, निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. त्याचे वडील देखील चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. चला तर, मग आज जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

रीना दत्तासाठी रक्ताने पत्र लिहिले!

आमिर खानच्या आयुष्यात आलेल्या एका मुलीने त्याला प्रेमात धोका दिला होता. त्यावेळी खूप दुःखी झालेल्या आमिर खानने चक्क मुंडन केले होते. इतकेच नाही तर, आमिरने रीना दत्ताला स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले होते. त्यावेळी दोघे नुकतेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि रीना त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.

आमिरच्या अभिनयाला वडिलांचा विरोध!

आपल्या मुलाने अभिनेता बनावे, असे आमिर खानच्या वडिलांना मुळीच वाटत नव्हते. आमिर खानच्या वडिलांनी त्याला अभिनय करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याच्या आईने त्याला त्याच्या आवडीचे करियर करण्याचा सल्ला दिला. ‘अवांतर’ नावाच्या नाट्यसमूहाने आमिरच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी त्याची मदत केली होतीमात्र, आपला पहिला चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही, हे कळताच त्याने नोकरी सुरू केली. या दरम्यानच्या काळात त्याने आपला कलात्मक अनुभव वाढवला. या काळात त्याने नाट्यनिर्मितीत काम केले.

Bollywood Nostalgia: प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळाले होते माहितीये का? वाचा...

आमिरला पुरस्कार सोहळ्यात जाणे आवडत नाही!

आमिर खानला कोणत्याही अवॉर्ड फंक्शन्समध्ये जाणे अजिबात आवडत नाही. याचे कारण १९९०चा एक पुरस्कार सोहळा असल्याचे म्हटले जाते. त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आमिर खान सनी आणि सनी देओल यांच्यात चुरस होती. मात्र, सनीला 'घायल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले होते. तेव्हापासून आमिर खान कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला जात नाही.

१०० पानं खाल्ली!

‘पीके’ चित्रपटातील आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे सादर करता यावी यासाठी आमिर खानने तब्बल १०० पान खाल्ले होते. या चित्रपटात त्याने एलियनची भूमिका साकारली होती. २०१४मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.

दंगलसाठी वाढलेले वजन

‘दंगल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खानने त्याचे वजन ९७ किलोपर्यंत वाढवले होते. तर, या चित्रपटानंतर फिट लूकमध्ये येण्यासाठी त्याने २० किलो वजन कमी केले. ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०२४ कोटी रुपयांची कमाई करण्यासोबतच, भारत आणि जगभरात अनेक पुरस्कार जिंकले होते.

Whats_app_banner