Guneet Monga: ऑस्कर पटकावल्यानंतर गुनीत मोंगा यांचे भारतात जल्लोषात स्वागत
Guneet Monga: गुनीत मोंगा यांच्या स्वागतासाठी अनेकजण मुंबई विमानतळावर पोहोचले होते. त्यांनी गुनीत यांचे जल्लोषात स्वागत केले.
चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळ्याला नुकताच सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्यात भारताने दोन ऑस्कर जिंकले. ऑस्कर जिंकल्यानंतर मायदेशी परतलेल्या गुनीत मोंगा यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या माहितीपटाची निर्मिती गुनीत मोंगानं केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक गोन्साल्विसने केले आहे. शुक्रवारी गुनीत ऑस्करची ट्रॉफी घेऊन भारतात परतली तेव्हा मुंबई विमानतळावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुनीतचा पती सनी कपूर देखील तिच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचला होता. गुनीतने स्वत: सोशल मीडियावर विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
वाचा: ऑस्कर सोहळ्यात दीपिका पादूकोणला ओळखण्यात झाली मोठी चूक
मुंबई विमानतळावर काहींनी गुनीतचे गळ्यात फुलांची माळ घालून स्वागत केले तर काहींनी गुनीतचे औक्षण केल. सध्या सोशल मीडियावर गुनीतचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.
विभाग