१५ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी…; ‘मॅडम सर’च्या शिल्पा शिंदेच्या कमेंटवर गुल्की जोशीची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  १५ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी…; ‘मॅडम सर’च्या शिल्पा शिंदेच्या कमेंटवर गुल्की जोशीची प्रतिक्रिया

१५ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी…; ‘मॅडम सर’च्या शिल्पा शिंदेच्या कमेंटवर गुल्की जोशीची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Feb 01, 2023 05:55 PM IST

Madam Sir Serial: शिल्पा शिंदेने मालिकेच्या निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यावर गुल्की जोशीने प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिंदे
शिल्पा शिंदे (HT)

छोट्या पडद्यावरील 'मॅडम सर' ही मालिका कायम चर्चेत असते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत. हे आरोप पाहून अभिनेत्री गुल्की जोशीने प्रतिक्रिया दिली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स नुसार, शिल्पा शिंदेने मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. 'मॅडम सर या मालिकेत शिल्पा शिंदे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार होती. तिची भूमिका जवळपास १०-१५ दिवस दिसणार होती. मात्र, निर्मात्यांनी अचानक मालिकेतून ब्रेक दिला' असा शिल्पाने खुलासा केला होता. इतकच काय तर शिल्पाने पुढे सांगितले की शुटिंग सुरु असताना ही मालिका बंद होणार असल्याचे तिला कळाले तसेच या मालिकेचा दुसरा सिझन येणार असल्याची माहिती समोर आली.

निराशा व्यक्त करत शिल्पाने सांगितले की जर मला माहिती असते की मालिकेतून ब्रेक देण्यात येणार आहे तर मी भूमिका करण्यासाठी कधी तयारच झाले नसते. अभिनेत्री गुल्की जोशीने हे ऐकून शिल्पाला चांगलेच सुनावले आहे.

गुल्की जोशी 'मॅडम सर' या मालिकेत हसीना मलिकची भूमिका साकारत आहे. एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'प्रेक्षकांनी ठरवायला हवे की या भूमिकेसाठी कोण पात्र आणि कोण नाही. या जगात दोन प्रकराचे लोक असतात. एक जे सकारात्मकतेवर विश्वास ठेवतात आणि दुसरे नकारात्मकतेवर लक्ष केंद्रीत करतात. लोकांना माहिती आहे कोण कसे आहे ते.'

पुढे गुल्की म्हणाली, 'प्रेक्षक हे नेहमीच योग्य असतात. जर त्यांना ही मालिका मनापासून आवडत नसती तर मॅडम सर मालिकेला तीन वर्ष पूर्ण झाली नसती. मला असे वाटते की १५ मिनिटांची प्रसिद्धी ही स्वर्गात पोहोचवण्यासारखी असते. मला अशा लोकांची काळजी वाटते'

Whats_app_banner