Guess the actress: सध्या जवळपास सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ३० वर्षात किती बदल झाले हे दाखवले आहे. अभिनेत्रीचा सुरुवातीचा व्हिडीओ पाहाता तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. नुकताच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ३० वर्षात किती बदल झाले आहेत हे सांगितले आहे. हेमांगीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती कशी दिसायची आणि आता कशी दिसते हे दाखवले आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी नुकताच क्लिक केलेला एक ग्लॅमरस फोटो देखील दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हेमांगीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: अरिजीत सिंहला पाहून रिंकूने असे काही केले की नेटकरीही झाले चकीत
लहाणपणीच्या फोटोत हेमांगी निळ्या रंगाच्या फ्रॉकवर दिसतेय. तर नंतरच्या फोटोत फिकट तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि लाल रंगाच्या फ्लॉवर प्रिंट मोनोकिनीमध्ये हेमांगीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने, “पहिला फोटो आणि शेवटचा व्हिडीओ यात फक्त ३० वर्षांचे अंतर आहे” असे म्हटले आहे. हेमांगीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एका तासात या व्हिडीओला १३ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
वाचा: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
सध्या हेमांगी झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत काम करताना दिसत आहे. तसेच ती ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी विनोदी शोमध्ये देखील काम करताना दिसत आहे. तिच्यासोबत या शोमध्ये अभिनेता कुशल बद्रिके देखील दिसत आहे. तसेच हेमांगीचे जन्मवारी हे नाटक देखील चर्चेत आहे.