Grammys Award 2024 Updates: यंदाचा ६६वा ग्रॅमी पुरस्कार २०२४ हा सोहळा नुकताच लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. जगभरातील संगीत क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराची सगळेच वाट बघत असतात. या अवॉर्ड शोमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाण्यालाही नामांकन मिळाले होते. मात्र, त्यांचे हे गाणे ग्रॅमी पुरस्कार जिंकू शकलेले नाही. नरेंद्र मोदी यांचे फाल्गुनी शाहसोबतचे ‘ॲब्यडन्स इन मिलेट्स’ हे गाणे खूप चर्चेत होते. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते. पण, या गाण्याला पुरस्कार मिळू शकलेला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या या गाण्याला एका भारतीय गाण्यानेच मात दिली आहे. भारतीय वंशाच्या कलाकारालाच हा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध तालवादक झाकीर हुसेन यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
‘ॲब्युडन्स इन मिलेट्स’ या गाण्याची सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाल्गुनी शाह यांचा उल्लेख केला होता आणि त्यांची भेटही घेतली होती. त्यांनीच फाल्गुनी शहा यांना मिलेट्सवर गाणे बनवण्याची कल्पना दिली होती. त्यानंतर ‘ॲबडन्स इन मिलेट्स’ या नावाचे एक गाणे तयार करण्यात आले. फाल्गुनी शहा आणि तिचे पती गौरव शाह यांनी हे गाणे बनवले होते. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीत नामांकन मिळाले होते. स्वतः नरेंद्र मोदी यांनी या गाण्याचे बोल तयार करण्यात हातभार लावला होता. मात्र, हे गाणे हा पुरस्कार जिंकू शकले नाही.
अनेक गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते. यात बेला फ्लेक, झाकीर हुसेन, एडगर मेयर आणि राकेश चौरसिया यांच्या 'पास्तो' गाण्याचा समावेश होता. याच गाण्याने सगळ्यांना मात देत हा पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय नामांकन मिळालेल्या गाण्यांमध्ये अरुज आफताब, विजय अय्यर आणि सहजाद इस्माईल यांच्या ‘शॅडो फोर्सेस’ या गाण्याला नामांकन मिळाले होते. पण हे गाणेही पुरस्कार मिळवू शकले नाही.
प्रसिद्ध भारतीय तबलावादक झाकीर हुसेन हे आपल्या कलेने लोकांचे दीर्घकाळ मनोरंजन करत आहेत. यापूर्वीही त्यांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. पण, यावर्षी त्यांनी नवा रेकॉर्ड सेट केला आहे. या वर्षी झाकीर हुसेन यांनी ग्रॅमीमध्ये ३ पुरस्कार जिंकले आहे. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणी व्यतिरिक्त, त्यांना ‘बेस्ट कंटेमप्रेरी इंस्ट्रुमेंटल अल्बम’ आणि ‘सर्वोत्कृष्ट इंस्ट्रुमेंटल कंपोझिशन’चे पुरस्कार देखील मिळाले आहेत. तर, बासरीवादक राकेश चौरसिया यांना २ ग्रॅमी पुरस्कार मिळाले.