मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Grammys 2024: यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! कधी आणि कुठे पाहता येणार सोहळा? वाचा...

Grammys 2024: यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! कधी आणि कुठे पाहता येणार सोहळा? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2024 09:50 AM IST

Grammys 2024 india time: यंदा ‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कारांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. चला तर, भारतात हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊया...

Grammys 2024 india time PM Narendra Modi is also nominated in Grammys
Grammys 2024 india time PM Narendra Modi is also nominated in Grammys

Grammys 2024 india time: मनोरंजन आणि संगीत विश्वातील प्रतिष्ठीत पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्काराच्न्ही घोषणा लवकरच होणार आहे. ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्कारांचा हा भव्यदिव्य कार्यक्रम, रविवार ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे ‘ऑस्कर’ पुरस्कार हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ‘ग्रॅमी’ पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम यामुळे वाखाणले जाते. जगभरातील रचल्या गेलेल्या संगीतांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार विविध श्रेणींमध्ये वितरित केले जातात. ‘ग्रॅमी’ पुरस्कारांचे यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. यंदा या पुरस्कारांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. चला तर, भारतात हा सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊया...

कधी आणि कुठे पाहता येईल ‘ग्रॅमी २०२४’?

‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कारांचे आयोजन लॉस एंजेलिसमध्ये करण्यात आले आहे. रविवार, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तुम्हाला हा शो लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही तो ‘CBS’ आणि ‘Paramount Plus’ वर पाहू शकता. हा पुरस्कार सोहळा रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतात त्याच्या थेट प्रक्षेपणाची वेळ सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून असेल. यंदाच्या ‘ग्रॅमी २०२४’ लाईव्ह स्ट्रीमिंग Hulu Plus Live TV, YouTube TV आणि Fubu TV वर पाहू शकता.

Shahid Kapoor: शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू...

यावेळी या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दक्षिण अमेरिकन कॉमेडियन-लेखक ट्रेव्हर नोह करत आहेत. याआधी देखील त्यांनी सलग तीन वेळा हा शो होस्ट केला होता. याशिवाय त्यांचीही दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बमसाठी नामांकन मिळाले आहे.

‘ग्रॅमी २०२४’मध्ये भारताचाही दबदबा!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतीय संगीत देखील जगभरात खूप पसंत केले जाते. आत्तापर्यंत अनेक भारतीय गायक-संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यात पंडित रविशंकर, गुलजार, एआर रहमान, रिकी केज, झुबिन मेहता आणि फाल्गुनी शाह यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या ‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘ॲबडन्स इन मिलेट्स’ या गाण्यातील गीतलेखनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. या गाण्याला फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी संगीत दिले आहे.

WhatsApp channel