गोविंदाच्या पत्नीने 'या' कारणासाठी थेट धर्मच बदलला, स्वतः केला धक्कादायक खुलासा-govindas wife changed religion directly to drink wine herself made a shocking revelation ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गोविंदाच्या पत्नीने 'या' कारणासाठी थेट धर्मच बदलला, स्वतः केला धक्कादायक खुलासा

गोविंदाच्या पत्नीने 'या' कारणासाठी थेट धर्मच बदलला, स्वतः केला धक्कादायक खुलासा

Sep 20, 2024 02:39 PM IST

Govinda's Wife's Religion: बॉलिवूडपासून दूर असलेल्या सुनीता त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात.

Why Govinda's Wife Changed Religion
Why Govinda's Wife Changed Religion (instagram)

Why Govinda's Wife Changed Religion:  बॉलिवूड अभिनेता गोविंदाने १९८७ मध्ये सुनीतासोबत लग्न केले आहे. हे जोडपे ४० वर्षांहून अधिक काळ एकमेकांना ओळखतात आणि अजूनही एकत्र आहेत. बॉलिवूडपासून दूर असलेल्या सुनीता त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या कोणत्याही विषयावर सर्वांसमोर आपले मत व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाहीत. आणि गेल्या काही वर्षांपासून त्या अभिनेता पती गोविंदासोबत विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये दिसत असतात. श्रीमंत कुटुंबातून आलेली सुनीता आई वडिलांचा आंतरजातीय विवाह असल्याने पंजाबी आणि नेपाळी आहे. पण तरीही ती ख्रिश्चन धर्माचे पालन करते. नुकतंच दिलेल्या एका नवीन मुलाखतीत त्यांनी आपल्या धर्मांतराचे कारण उघड केलेया आहे.

नुकतंच सुपरस्टार गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा 'टाइमआउट विथ अंकित' या पॉडकास्ट शोमध्ये दिसल्या होत्या. या शोमधील संवादादरम्यान त्यांनी आपल्या बालपणीचे किस्से, गोविंदासोबतची आपली प्रेमकहाणी आणि लग्नानंतरचे आयुष्य असे अनेक रंजक किस्से शेअर केले. दरम्यान त्यांना आपण ख्रिश्चन शाळेत शिकत असतानाची एक मनोरंजक घटना आठवली. कारण एके दिवशी त्यांनी आपल्या पालकांना न सांगता गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. गोविंदाच्या पत्नीने पत्नीने सांगितले की, आपल्याला थोडीशी वाईन मिळावी म्हणून आपण हा निर्णय घेतला होता. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

याबाबत पुढे सांगताना सुनीता म्हणाल्या, 'माझा जन्म वांद्रे येथे झाला आहे. माझा बाप्तिस्मा झाला आहे. मी ख्रिश्चन शाळेत गेले आणि माझे सर्व मित्र ख्रिश्चन होते. लहानपणी, मी ऐकले की येशूच्या रक्तात वाइन आहे. आणि मनात विचार आला, 'वाईन म्हणजे दारू'. मी नेहमीच खूप हुशार होते. वाईन पिण्यात काही वाईट नाही. फक्त थोडी वाईन पिण्यासाठी मी स्वतःला ख्रिश्चन बनवले. असे सुनीता यांनी म्हटलं आहे.

गुरुद्वारा, मंदिर आणि चर्चमध्ये जातात सुनीता अहुजा-

या पॉडकास्टमध्ये सुनीता म्हणाल्या की, मी अजूनही ख्रिश्चन धर्माचे पालन करते. आणि शनिवारी चर्चलाही जाते. नंतर त्यांना विचारण्यात आले की, त्यांचे पालक त्यांच्या या धर्मांतराच्या निर्णयावर नाराज आहेत का? पण सुनीता म्हणाल्या की, त्यांना याची कधीच कल्पना आली नाही.

गोविंदा सुनीताला मिनी स्कर्ट घालण्यास नकार देत असे-

यादरम्यान सुनीता यांना आपल्या आणि गोविंदामधील सांस्कृतिक फरक आठवला. आपण त्यावेळी पॉश एरिया असलेल्या वांद्रे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे तर गोविंदा विरारमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांनी मिनी स्कर्ट घालणे गोविंदा यांना आवडत नसे. आणि त्याच्या आईलाही ते आवडणार नाही असेही सांगितले होते. या कारणासाठी त्यांनी साडी नेसण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सुनीता यांना मनमोकळेपणाने अनेक किस्से शेअर केले आहेत.

Whats_app_banner