८० आणि ९०च्या दशकात अनोख्या डान्स शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. त्या काळात त्याने एकापेक्षा एक असे सरस चित्रपट केले. डान्स, कॉमेडी आणि इमोशनल सीन्सचा बादशहा असणाऱ्या गोविंदाचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत होते. गेल्या काही वर्षांपासून गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर असला तरी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर गोविंदाची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे.
गोविंदाने नुकताच रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. या पार्टीला तो कुटुंबीयांसोबत हजर होता. या पार्टीमधील एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने माझी दुसरी बायको असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: रश्मिकानंतर सारा तेंडुलकर 'डीपफेक'ची बळी, शुभमन गिलसोबतचा फोटो व्हायरल
गोविंदाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिवाळी पार्टीतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत दिसत आहे. बऱ्याच दिवसाने डेव्हिड धवन भेटल्यामुळे गोविंदाने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने "८० आणि ९०च्या दशकात माझ्या दोन पत्नी होत्या. एक सुनीता आणि दुसरी डेव्हिड" असे कॅप्शन दिले आहे. गोविंदाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या.
डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन, तसेच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गोविंदा आणि डेव्हिडच्या फोटोवर प्रेमाचा, लाइक्सचा वर्षाव केला आहे. डेव्हिड आणि गोविंदा यांनी पुन्हा एकत्र काम करावं अशी इच्छाही अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या