बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी कोलकात्याला निघत असताना परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून ही गोळी निघाली होती. ही गोळी त्याच्या पायाला लागली. त्यामुळे त्याला क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या अपघाताची बातमी समोर आल्यापासून त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच गोविंदाने आपल्या चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे.
गोविंदा ऑडिओ मेसेजमध्ये म्हणाला, 'नमस्कार, प्रणाम, मी गोविंदा. तुम्हा सर्वांच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने व गुरुकृपेने मी आता ठीक आहे. चुकून एक गोळी लागली होती, जी शस्त्रक्रियेनंतर काढून टाकण्यात आली आहे. मी लवकर बारा व्हावा म्हणून आपण केलेल्या प्रार्थनेबद्दल आपल्या सर्वांचे आणि डॉक्टरांचे आभार.'
गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाह मुंबईतील त्याच हॉस्पिटलच्या बाहेर दिसली जिथे गोविंदाला दाखल करण्यात आले आहे. कश्मीरा गोविंदाला भेटण्यासाठी आल्याचे समजते. कश्मीरा शहा आणि गोविंदाच्या कुटुंबात दुरावा आहे. काश्मीरा व्यतिरिक्त गोविंदाचा भाऊ क्रिती कुमार आणि पुतण्या विनय आनंद देखील रुग्णालयात पोहोचले होते.
गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये सकाळी ११ वाजता पोहोचलेले शिवसेना सदस्य दीपक सावंत म्हणाले, "मी त्याच्या सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो की तो पूर्णपणे ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही. तो एक अपघात होता. ४८ तासात त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांनी आपलं काम चोख पार पाडलं आहे. त्याचे कुटुंबीय आत आहेत आणि ते सर्व गोविंदा लवकर बरा होत असल्याने आनंदी आहेत."
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
अभिनेता गोविंदा सकाळी ५च्या सुमारास घरातून बाहेर पडत होता. त्याआधी त्याने आपली बंदूक साफ केली. मात्र, अभिनेता स्वतःची रीव्हॉलव्हर साफ करत असताना तिचे लॉक उघडेच राहिल्याने त्यातून गोळी सुटली. यामुळे जखमी झालेला अभिनेता सध्या मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्याच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे. आता गोविंदाने स्वत: व्हिडीओ शेअर करत प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. गोविंदा ठिक असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला आहे.