बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यामधील वाद हा जगजाहीर आहे. पण आता या मामा- भाचाच्या जोडीमधील वाद संपल्याचे स्पष्ट झाले आहे. गोविंदा नुकताच कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कृष्णा अभिषेकने गोविंदाला मिठी मारली. कृष्णा गोविंदाच्या घरी गेल्यावर शोच्या आधी दोघांची भेट झाली होती. आता या दरम्यान गोविंदानेच त्या दोघांमध्ये दुरावा येण्यामागचं कारण काय होतं हे सांगितलं आहे.
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भांडण सुरु होते. पण त्यांचे भांडण का झाले होते असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्यांच्या भांडणाचे कारण स्वत: गोविंदाने सांगितले आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा कपिलच्या शोमध्ये कृष्णाच्या एका जोकमुळे नाराज होते. कृष्णाची पत्नी कश्मिरा आणि गोविंदा यांच्या पत्नीचे सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर आता कपिलच्या शोमध्ये गोविंदाने या विषयावर चर्चा केली आणि त्यावर कृष्णा म्हणाला, 'हो हो, माझंही मामीवर प्रेम आहे. काही चुकीची भावना असेल तर मला सॉरी म्हणायचे आहे.'
कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद कश्मिरा शाहच्या एका ट्विटने सुरू झाला होता. झालं असं की, कृष्णा एक शो करत होता, ज्यात गोविंदाने आधी येण्यास नकार दिला होता. पण, कृष्णाने खूप समजूत घातल्यानंतर अभिनेत्याने होकार दिला. दरम्यान, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, काही लोक केवळ पैशासाठी नाचतात. गोविंदाची पत्नी सुनीताला कश्मिराचे हे ट्विट आपल्या कुटुंबासाठी असल्याचे वाटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मिरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केली.
कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेक मध्येच म्हणाला की, 'पहिल्यांदाच मी माझं पात्र मध्येच सोडत आहे. पण मला सांगायचं आहे की आजचा दिवस एक खास दिवस आणि सर्वात संस्मरणीय दिवस आहे. मामासोबत स्टेज शेअर करत असताना माझा ७ वर्षांचा वनवास संपला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे.'
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
गोविंदा म्हणाला, "मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या घरी माझ्या आईनंतर आम्ही सर्व भावंडे खूप नशीबवान होतो की आईसारखी मोठी बहीण मिळाली. कृष्ण हा त्याच मातेचा मुलगा आहे. माझ्याकडून वनवास झाला नाही. खरं तर हे दुर्दैव आहे. पण माझा देवावर विश्वास आहे. तो कधीही कोणावर अन्याय करत नाही."
संबंधित बातम्या