गटरात उतरलो, सैनिकासारखी ट्रेनिंग केली! कसं व्हायचं ‘सीआयडी’चं शूटिंग? दयाने सांगितली पडद्यामागची कहाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गटरात उतरलो, सैनिकासारखी ट्रेनिंग केली! कसं व्हायचं ‘सीआयडी’चं शूटिंग? दयाने सांगितली पडद्यामागची कहाणी

गटरात उतरलो, सैनिकासारखी ट्रेनिंग केली! कसं व्हायचं ‘सीआयडी’चं शूटिंग? दयाने सांगितली पडद्यामागची कहाणी

Nov 04, 2024 05:08 PM IST

CID Fame Dayanand Shetty : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, या शोमध्ये सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणाऱ्या अभिनेता दयानंद शेट्टी याने आधीच्या सीझनच्या शूटिंगबद्दल मनोरंजक किस्से शेअर केले आहेत.

CID Fame Dayanand Shetty
CID Fame Dayanand Shetty

CID Fame Dayanand Shetty : अभिनेता दयानंद शेट्टी प्रसिद्ध शो ‘सीआयडी’च्या नवीन सीझनसह टेलिव्हिजनवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, या शोमध्ये सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणाऱ्या अभिनेता दयानंद शेट्टी याने आधीच्या सीझनच्या शूटिंगबद्दल मनोरंजक किस्से शेअर केले आहेत. या शोच्या संकल्पनेने सगळ्या कलाकारांना २० वर्षे कसे जोडून ठेवले आणि या शोचे चित्रीकरण कसे झाले, ते सांगितले.

यूट्यूब चॅनल एपी पॉडकास्टवर, दयाने ‘सीआयडी’ची इतर टीव्ही मालिकांशी तुलना केली. यावेळी बोलताना दया म्हणाला की, 'सीआयडी’चा प्लस पॉइंट म्हणजे या सेटवर काम करताना प्रत्येक दिवस वेगळा होता. या मालिकेची जागा आणि सहकलाकार सतत बदलत राहिले. या शोच्या शूटिंग दरम्यान कधी मोठ्या स्टारसोबत शूटिंग करायला मिळायची तर कधी इतर कलाकारांसोबत काम करावे लागायचे. आमच्याकडे प्रत्येक एपिसोडमध्ये जवळपास १५-१७ लोकेशन्स होती. त्यामुळे आम्हाला कधीच कंटाळा आला नाही.’

आम्ही सेटवरचे मजूर!

दया पुढे म्हणाला की, 'आमच्या सेटवर प्रत्येक अभिनेत्यासाठी एकच काम होतं ते म्हणजे अभिनय. तिथे कोणतीही तडजोड नव्हती आणि कुणीही स्टार नव्हते. आम्ही सगळे ‘सीआयडी’च्या सेटवरचे मजूर होतो. इतर शोमध्ये कसे असते की, प्रत्येक मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याला स्वतःची व्हॅनिटी व्हॅन हवी असते. अगदी छोट्या अभिनेत्यालाही स्वतःची स्पेस हवी असते. पण ‘सीआयडी’मध्ये, आम्ही ७-८ जण एकच मेकअप रूम शेअर करायचो. वेगळे टेबल मिळाले तरी, आम्ही बाजूला सारून एक मोठी खोली बनवायचो. तिथे आम्ही खायचो, प्यायचो आणि मस्ती करायचो.’

मिथुन चक्रवर्तींच्या पहिल्या पत्नीचे निधन; लग्नाच्या चार महिन्यांतच अभिनेत्यापासून झाल्या होत्या वेगळ्या!

कधीच भेदभाव केला नाही!

दया आठवणी सांगताना पुढे म्हणाला की, 'सेटवर कधीच कोणताही भेदभाव नव्हता. कोणालाही मोठा किंवा छोटा अभिनेता मानलं जात नव्हतं किंवा ज्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना वेगळी वागणूक दिली जात नव्हती. आम्ही सगळे समान व्यक्ती होतो, एकमेकांशी आदराने वागायचो. सर्व काही अगदी मिलिटरी सेटअप सारखं होतं. प्रत्येकाने आपापले काम केले आणि कोणीही स्वत:ला लहान-थोर मानत नव्हतं.’

'आम्ही दिग्दर्शकांना कधीच सांगितले नाही की, आम्ही इकडे उडी घेऊ शकत नाही, किंवा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळेप्रसंगी अगदी गटारातही उतरून शूटिंग केलं. आम्ही मॅनहोल्समध्ये पडलो, सांडपाणी आणि घाणेरड्या पाण्यात उतरलो. अगदी आर्मीची ट्रेनिंग असावी, असे शूटिंग करायचो’, असे दया म्हणाला.

Whats_app_banner