Good Morning Messages In Marathi: असं म्हटलं जातं की, दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या विचाराने झाली तर दिवस चांगला जातो. आपल्या प्रियजनांनी पाठवलेला एक विशेष संदेश दिवसभर आपले मन सकारात्मक ठेवू शकतो, ज्यामुळे आपला दिवस चांगला होतो. लोक अंथरुणावरून उठण्यापूर्वीच फोनकडे पाहतात, त्यामुळे सकाळी सर्वात आधी हातात फोन असतो. अशावेळी एक सुंदर मेसेज तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना असेच खास मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे' खास तुमच्यासाठी…
स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी
एक पाऊल पुढे टाकले की,
यश निश्चित असते.
गुड मॉर्निंग
----------------------------------
दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग म्हणत हसण्याने करा,
ती तुम्हाला प्रेरणा देण्याचे काम करेल.
गुड मॉर्निंग
----------------------------------
चुका बहुतेकांच्या होतात,
हे लक्षात ठेवा आणि
स्वत: आपल्या चुका सुधारा.
शुभ सकाळ
----------------------------------
संघर्ष यात्रेत तुम्ही एकटे नाही,
तुमच्याशी संबंधित प्रत्येकजण
तुमच्याशी संघर्ष करत असतो.
----------------------------------
आयुष्यात शांतता हवी असेल तर
लोकांच्या गोष्टींवर नव्हे तर
आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा
गुड मॉर्निंग
----------------------------------
ज्या ठिकाणी दोन ठोकळे,
आपल्या स्थितीचे गुणगान गातात,
त्या ठिकाणी नेहमी गप्प राहा.
गुड मॉर्निंग
----------------------------------
मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही
मित्रांनो, निसर्ग पक्ष्याला नक्कीच अन्न देतो,
पण घरटे देत नाही.
शुभ सकाळ
----------------------------------
काही वेगळं करायचं असेल
तर गर्दीपासून दूर जा,
गर्दी हिंमत देते,
पण ओळख हिरावून घेते.
गुड मॉर्निंग
----------------------------------
मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे
वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा
जगात दुसरी कोणतीच
संपत्ती मोठी नाही.
शुभ सकाळ!
----------------------------------
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
----------------------------------
यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात!
गुड मॉर्निंग
----------------------------------
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं जोडायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त माणसे महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी!
शुभ सकाळ
----------------------------------
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की,
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही,
आणि ती असते… ‘आपलं आयुष्य’
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा!
शुभ सकाळ