छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' ही मालिका गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता काही कलाकारांनी मालिका सोडल्याचे समोर आले आहे. जवळपास १६ वर्षांनंतर मालिकेतील एका कलाकाराने शो सोडल्याचे ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत गोली ही भूमिका साकरणारा कुश शहा याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका यूजरने कुशसोबता फोटो शेअर केला आहे. हा फोटो न्यूयॉर्कमधील आहे. चाहत्याने हा फोटो शेअर करत, तो कुशला न्यूयॉर्कमध्ये भेटला. त्यावेळी कुशने त्याला सांगितले की त्याने मालिका सोडली आहे आणि न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेण्यासाठी आला आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी नाराज झाले आहेत.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार
एका यूजरने आपण लहानपणापासूनच गोलीला पाहिले आहे. त्याला लहानाचे मोठे होताना इथेच पाहिले आहे. आता तोही मालिका सोडून गेला तर मजा येणार नाही अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'कुशपेक्षा गोलीची व्यक्तिरेखा कोणीही चांगल्या प्रकारे साकारू शकत नाही' असे म्हटले आहे.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा
सोशल मीडियावर यूजरची ही पोस्ट व्हायरल होताच डिलिट केली आहे. बरं, कुशचं या शोमधून जाणं खरं आहे की नाही, हे खुद्द कुश आणि शोचा निर्मात्यांनी सांगितलेले नाही. कुशने मालिका सोडून नये अशी इच्छा चाहत्यांनी केली आहे.
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जरी चर्चेत असली तरी गेल्या काही दिवसांपासून कलाकार हे सोडून जाताना दिसत आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकर, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता आणि आता गोलीने देखील मालिका सोडल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या