Golden Globe 2025 Winner List : 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२५'च्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बिगर इंग्रजी विभागात तर, दिग्दर्शिका पायल कपाडियाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका श्रेणीत नामांकन मिळाले होते. त्यामुळे यावेळी या पुरस्कारात भारतीय चित्रपटाचे नाव कोरले जाईल, अशी आशा या भारतीयांनी व्यक्त केली होती. मात्र, आता 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बिगर इंग्रजी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या दोन्ही श्रेणीतून बाहेर पडला. पाहा यावर्षीच्या विजेत्यांची यादी...
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहाय्यक भूमिका) - झो साल्दाना, एमिलिया पेरेझ
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी मालिका: संगीत आणि विनोद) - जीन स्मार्ट, हॅक्स
*सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहाय्यक भूमिका) - कायरन कुलकिन, एक रिअल पेन
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी मालिका, नाटक) - हिरोयुकी सनदा, शोगुन
*सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री (सहाय्यक भूमिका) - जेसिका गनिंग, बेबी रेनडिअर
*सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता (सहाय्यक भूमिका) - ताडानोबू असानो, शोगुन
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (टेलिव्हिजन मालिका) - जेरेमी अॅलन व्हाईट, द बेअर
* सर्वोत्कृष्ट पटकथा - चित्रपट: पीटर स्ट्रोघन, कॉन्क्लेव्ह
* सर्वोत्कृष्ट स्टँडअप कॉमेडी (टेलिव्हिजन) - अली व्हॉन, अली वोंग: सिंगल लेडी
* सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-इंग्लिश) - एमिलिया पेरेझ
सर्वोत्कृष्ट अभिनेता (टेलिव्हिजन लिमिटेड मालिका, अँथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट) - कॉलिन फॅरेल, द पेंग्विन
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टेलिव्हिजन लिमिटेड मालिका, अँथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट) - जोडी फोस्टर, ट्रू डिटेक्टिव्ह: नाईट कंट्री
*सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट: संगीत किंवा विनोदी) - डेमी मूर, द सबस्टन्स
*सर्वोत्कृष्ट अभिनेता (चित्रपट: संगीत किंवा विनोदी) - सेबॅस्टियन स्टॅन, अ डिफरंट मॅन
*सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेटेड) - फ्लो*
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट) - ब्रॅडी कॉर्बेट द ब्रॉटलिस्ट
*सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर (चित्रपट) - चॅलेंजर्स
*सर्वोत्कृष्ट मूळ गीत (चित्रपट) - एल माल, एमिलिया पेरेझ
*सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस - विकेड
*सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन लिमिटेड मालिका (अँथोलॉजी मालिका किंवा दूरचित्रवाणी चित्रपट) - बेबी रेनडिअर
*सर्वोत्कृष्ट दूरचित्रवाणी मालिका (म्युझिकल किंवा कॉमेडी) - हॅक्स
पायल कपाडियाचा 'ऑल वी इमॅजिन एज लाइट' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर स्ट्रीमिंग होत आहे. हा सिनेमा बघायचा असेल, तर हॉटस्टारवर पाहू शकता.
संबंधित बातम्या