Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव

Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चा डंका! ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव

Jan 08, 2024 01:11 PM IST

Golden Globe Awards 2024: यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा गाजावाजा पाहायला मिळाला आहे.

Golden Globe Awards 2024 Oppenheimer
Golden Globe Awards 2024 Oppenheimer

Golden Globe Awards 2024: जगभरात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’ नुकताच पार पडला आहे. अमेरिकेतील कॅलेफोर्निया या शहरात ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा गाजावाजा पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं तर मिळवलीच होती, पान आता अनेक पुरस्कारांवर देखील नाव कोरलं आहे. एका अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

‘ओपनहायमर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिलियन मर्फी याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’ या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला आहे. तर, हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याला ‘ओपनहायमर’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला आहे. सध्या या चित्रपटाचे जगभरातून खूप कौतुक होत आहे.

Mitali Mayekar Post : नो ब्रा अँड ओव्हरसाइज क्लोथ्स…; अभिनेत्री मिताली मयेकरची पोस्ट व्हायरल

‘ओपनहायमर’ या चित्रपटासाठी अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा अभिनेत्याचा तिसरा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार आहे. यंदा देखील त्याने अनेक दिग्गज कलाकारांना मात देत हा पुरस्कार पटकावला आहे. या विभागामध्ये ‘पुअर थिंग्स’ फेम विल्यम डेफो, ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ फेम रॉबर्ट डीनेरो, ‘बार्बी’साठी रायान गॉसलिंग अशा अनेक कलाकारांना या विभागामध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, या सगळ्यांमध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने बाजी मारली. अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने ‘ओपनहायमर’ या चित्रपटात ‘लुईस स्ट्रॉस’ हे पात्र साकारले होते.

‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’मध्ये ‘ओपनहायमर’ला ‘बार्बी’ या चित्रपटाने देखील तगडी टक्कर दिली. गात वर्षी रिलीज झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. दोन्ही चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला होता.

Whats_app_banner