बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांचे लग्न अनेक कारणामुळे चर्चेत आहे. एकीकडे दोघांच्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ असे नाव देऊन निदर्शने केली जात आहेत. तर, दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक या जोडप्याचा फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, सोनाक्षीचा दुसरा भाऊ कुश सिन्हा याने देखील या लग्नाच्या वेगवेगळ्या चर्चांवर मौन सोडले आहे. सोनाक्षीला लव सिन्हा आणि कुश सिन्हा असे दोन भाऊ आहेत. हे दोघेही जुळे भाऊ आहेत. सोनाक्षीच्या लग्नाबद्दल बोलताना कुश काय म्हणाला वाचा…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर जेव्हा ‘हिंदुस्थान टाईम्स’ने लव सिन्हाला विचारले की, ‘तुम्ही सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित होता का? तेव्हा तो म्हणाला की, ‘कृपया एक-दोन दिवस द्या. जर मला वाटले की, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन, तर मी नक्कीच उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद.’ त्यानंतर आता कुश सिन्हा याका विचारण्यात देखील विचारण्यात आले की, तुम्ही'' बहिणीच्या लग्नाला उपस्थित होतात का? ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत कुश म्हणाला की, ‘मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मला जास्त दिसायला आवडत नाही.’
कुश पुढे म्हणाला की, ‘सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला मी उपस्थित होतो. कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक काळ होता. मला माझ्या बहिणीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि तिला आशीर्वाद द्यायचे आहेत.’
या विरोधादरम्यान सोनाक्षी सिन्हाने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षीने हे फोटो पोस्ट करत लिहिले की, 'असे वाटत होते की संपूर्ण विश्व दोन प्रेमळ लोकांना एकत्र आणण्यात व्यस्त झाले आहे.'
लग्नाआधी असं म्हटलं जात होतं की, शत्रुघ्न आणि संपूर्ण कुटुंब या लग्नावर खूश नाही. पण त्यानंतर लग्नाच्या एक दिवस आधी अभिनेत्याने सांगितले की, हे सर्व वृत्त चुकीचे असून तो लग्नाला नक्कीच उपस्थित राहणार आहे. लग्नाच्या अनेक फोटोंमध्ये शत्रुघ्न आपल्या मुलीसोबत खूप खुश दिसत होते. सध्या अभिनेत्रीला लग्नावरून ट्रोल केले जात आहे. त्यांच्या लग्नाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला जात आहे. यावर शत्रुघ्न यांनी उत्तर दिले की, ‘असे काहीबाही बोलणे हे लोकांचे काम आहे आणि माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. जे असे बोलत आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की, जा आणि आपलं काम करा.’
संबंधित बातम्या