Girish Bapat: गिरीश बापट यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्री झाली भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Girish Bapat Passed Away : लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.
पुण्याचे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दीनानाथ हॅास्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांच्यासोबतचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. “भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा: दिगंबर नाईक यांना बाईने केले हैराण, ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर
नगरसेवक ते आमदार खासदार झालेल्या बापट यांनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यात भाजपचे स्थान भक्कम केले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. याआधी त्यांना डिसेंबर २०२२ मध्ये दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कसबा पेठ पोट निवडणूकीत आजारी असतांनाही त्यांनी व्हील चेअर वरून येत प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसंच त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने नाकात नळीही लावण्यात आली होती. यावेळी त्यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आज अखेर त्यांचे निधन झाले आहे.