मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghungarachi chaal : होतकरू कलाकारांना मिळणारं हक्काचं व्यासपीठ! ‘कलावंत मराठी’ देणार नव्या कलाकारांना संधी

Ghungarachi chaal : होतकरू कलाकारांना मिळणारं हक्काचं व्यासपीठ! ‘कलावंत मराठी’ देणार नव्या कलाकारांना संधी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 07, 2024 02:09 PM IST

Ghungarachi chaal New Marathi Song: महाराष्ट्रातील कलासंस्कृतीचं नव्या पद्धतीनं दर्शन घडवण्यासाठी एक नवा कलाविष्कार ‘कलावंत मराठी’ घेऊन येत आहेत.

Ghungarachi chaal New Marathi Song
Ghungarachi chaal New Marathi Song

Ghungarachi chaal New Marathi Song : मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. दररोज शेकडो लोक कलाकार बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतात. मात्र, असह नव्या कलाकारांना फारशी संधी मिळत नाही. मात्र, अशाच कलाकारांसाठी आता ‘कलावंत मराठी’ने पुढाकार घेतला आहे. ‘कलावंत मराठी’ने म्युझिक अल्बम सृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याचा विडा उचलला आहे. महाराष्ट्रातील कलासंस्कृतीचं नव्या पद्धतीनं दर्शन घडवण्यासाठी एक नवा कलाविष्कार ‘कलावंत मराठी’ घेऊन येत आहेत. या माध्यमातून होतकरू नव्या दमाच्या कलाकारांना मिळणारं त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे.

‘शंकर बाबा’ या गाण्याच्या यशानंतर आता ‘कलावंत मराठी’ प्रस्तुत ‘घुंगराची चाळ’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधून कलावंताच्या जगण्याची कथा उलगडणार आहे. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून, दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे. तसेच या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर आहेत. किरण कोरे, सुरेखा पुणेकर, निकिता भोरपकर हे कलाकार या गाण्यात आहेत.

Imran Khan: उरली अवघी ३ ताटं अन् २ पेले; आलिशान आयुष्य जगणारा आमिर खानचा भाचा झाला कंगाल!

या नव्या प्रयोगाविषयी बोलताना निर्माते निलेश मनोहर मुणगेकर म्हणाले की, ‘कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं, हाच माझा हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा किंवा मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी १००हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. कलावंत मराठीच्या सर्वच कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो.’

यत, दिग्दर्शक दर्शन घोष नव्या गाण्याविषयी सांगतात की, ‘सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडींग जगात हिंदी, इंग्रजी गाण्यांसोबतचं मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत वेगवेगळे बदल होत आहेत. परंतु या स्पर्धात्मक जगात आपल्या महाराष्ट्रातील लोकसंगीत सादर करणाऱ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी कलावंत मराठीची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आमच्या पहिल्या ‘शंकर बाबा’ या गाण्याच्या यशानंतर आम्ही ‘घुंगराची चाळ’ हे नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.’

WhatsApp channel

विभाग