'गुम है किसी के प्यार में' या लोकप्रिय टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आयशा सिंहबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीची प्रकृती बिघडली असून, तिचा चेहरा इतका विद्रूप झाला आहे की, तिचा चेहरा ओळखता देखील येत नाहीय. आता स्वतः आयशा सिंहने तिचा फोटो शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये आयशा सिंह हसताना दिसत आहे. यातील एका फोटोत तिने एक पाउटही दिला होता. तिचा बबली लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. पण, कॅप्शन वाचताच चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खरंतर, या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेली वेदना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आली आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिची स्थिती सांगितली आहे आणि तिच्या चाहत्यांना विनंतीही केली आहे. आयशाने लिहिले की, 'हाय इंस्टा फॅमिली, मी काही काळ सक्रिय न राहिल्याबद्दल माफी मागते, कारण मी थोडीशी अस्वस्थ होते, परंतु मी लवकरात लवकर बरे होण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला लवकरच पुन्हा काम सुरू करायचे आहे.’
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, माझ्या गोपनीयतेचा आदर करा आणि माझ्यासाठी देवाकडे प्रर्थाना करा. जेव्हा आई बाबा म्हणायचे, जास्त हसू नकोस, नंतर रडावं लागेल... तसंच काहीसं झालं आहे. त्यामुळे पहिले तीन फोटो खूप हसरे आणि मजेशीर आहेत. पण शेवट.... चेहरा सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे. PS:- गाण्याची निवड... कारण मी स्वतःवर थोडे जास्त प्रेम करते.... प्रेम आणि प्रकाश, आयशा. आता अभिनेत्रीच्या शेवटच्या फोटोमध्ये तिच्या बदललेला आकार दिसत आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीचा चेहरा चांगलाच सुजलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या ओठाजवळ सूज दिसून येत आहे आणि ती इतकी वाईट आहे की, तिचा चेहरा खराब झाला आहे. याशिवाय तिच्या डोळ्यांवरही सूज दिसून येत आहे. अभिनेत्रीची ही अवस्था कशी झाली याचा खुलासा झालेला नाही. पण, तिच्या चेहऱ्याची ही अवस्था पाहून चाहते घाबरले आहेत. आता सर्वजण अभिनेत्रीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आता सोशल मीडियावर चाहते आयशाला खूप मेसेज पाठवत आहेत आणि तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.