मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: जानकी शोधू शकेल का नानांच्या पहिल्या लग्नाचं सत्य? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

Gharoghari Matichya Chuli: जानकी शोधू शकेल का नानांच्या पहिल्या लग्नाचं सत्य? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

Jul 09, 2024 02:32 PM IST

Gharoghari Matichya Chuli 9 July 2024 Serial Update: आश्रमात लावलेल्या फोटो फोटोमध्ये नानांबरोबर ती दुसरी बाई नक्की कोण आहे?, हे आता शोधून काढलेच पाहिजे, असं जानकीने ठरवलं आहे.

Gharoghari Matichya Chuli 9 July 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 9 July 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 9 July 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. रणदिवे कुटुंबाने हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची पत्रिका मंदिरात ठेवली आहे. यानंतर आता संपूर्ण कुटुंब पुढच्या तयारीला सुरुवात करणार आहे. देवाला पत्रिका ठेवून आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश सहकुटुंब आपल्या लग्नाची पत्रिका आपल्या चिमुकल्या मुलीला म्हणजेच ओवीला देणार आहेत. ओवीच्या हट्टामुळे खरंतर हा सगळा प्रकार सुरू आहे. आई-बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो? त्यांनी आपल्याला लग्नाला का बोलावलं नाही?, असे प्रश्न चिमुकल्या ओवीला पडले होते.

यामुळे ओवी चांगलीच नाराज झाली होती. आई-बाबांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये आपला एकही फोटो नसल्याने ओवी रागावून बसली होती. आता ओवीचा राग कसा घालवायचा, यासाठी सगळेच वेगवेगळे प्रयत्न करत होते. मात्र, यावर ओवीने स्वतःच उपाय सांगितला. ओवीने हट्ट केला की, आई-बाबा या दोघांचे पुन्हा एकदा लग्न लावून द्या. त्यामुळे आता रणदिवे कुटुंब ऋषिकेश आणि जानकी यांचं लग्न पुन्हा एकदा लावणार आहेत. म्हणूनच आता देवाला पत्रिका ठेवून आल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी अतिशय मानानं आपल्या मुलीला म्हणजे ओवीला पत्रिका देऊन लग्नात अगत्य येण्याचं निमंत्रण देखील देणार आहेत. इतकंच नाही तर, लग्नाला उपस्थित राहून आपल्या प्रत्येक फोटोमध्ये हजेरी लावावी, अशी विशेष विनंती देखील ते ओवीला करणार आहेत.

Tharala Tar Mag: मला माझी लाज वाटतेय; सायलीने अर्जुनकडे व्यक्त केली खंत! ‘ठरलं तर मग’मध्ये नेमकं काय झालं?

रणदिवे कुटुंबात लग्नाची लगबग!

एकीकडे रणदिवे कुटुंबात या लग्नाची लगबग सुरू आहे. तर, दुसरीकडे आता जानकीच्या मनात घोळत असलेला संशय कितपत खरा आहे, हे तपासून बघण्यासाठी ती एक नवी शक्कल लढवणार आहे. लग्नाच्या गडबडीत जानकी मुद्दाम आईच्या खोलीत जाऊन त्यांच्या कपाटातील काही वस्तू काढत असताना आई-बाबांच्या लग्नाचा फोटो देखील बाहेर काढणार आहे. मात्र, या लग्नाच्या फोटोत नानांबरोबर आईचं असल्याने जानकी थोडी गोंधळात पडते.

ट्रेंडिंग न्यूज

जानकी शोधू शकेल का नानांच्या लग्नाचं सत्य?

या फोटोत नानांबरोबर आई आहे, मात्र आश्रमात लावलेल्या फोटो फोटोमध्ये नानांबरोबर ती दुसरी बाई नक्की कोण आहे?, हे आता शोधून काढलेच पाहिजे, असं जानकीने ठरवलं आहे. त्यानंतर जानकी आता ऋषिकेशकडे जाऊन त्याला नानांना एखादा सख्खा भाऊ आहे का?, असं विचारणार आहे. आता जानकी नानांच्या पहिल्या लग्नाचं सत्य शोधून काढू शकेल की, नाही हे मालिकेच्या येत्या भागात करणार आहे.

WhatsApp channel