Gharoghari Matichya Chuli: सारंगला ऑफिसमध्ये खरंच मिळाली सावत्र वागणूक? सुमित्राचं वागणं बघून जानकीला बसणार धक्का!-gharoghari matichya chuli 8 august 2024 serial update sarang really got poor treatment in the office ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: सारंगला ऑफिसमध्ये खरंच मिळाली सावत्र वागणूक? सुमित्राचं वागणं बघून जानकीला बसणार धक्का!

Gharoghari Matichya Chuli: सारंगला ऑफिसमध्ये खरंच मिळाली सावत्र वागणूक? सुमित्राचं वागणं बघून जानकीला बसणार धक्का!

Aug 08, 2024 12:14 PM IST

Gharoghari Matichya Chuli 8 August 2024 Serial Update: ऐश्वर्याने अजूनही आपले कारस्थान रोखलेले नाही. आता ती सुमित्रा आईच्या मनात विष कालवण्याचं काम करणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 8 August 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 8 August 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 8 August 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता अतिशय धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता हृषिकेश हा सुमित्राचा नव्हे तर पार्वतीचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. इतकी वर्ष सुमित्रा आईने कधीही कोणत्या मुलामध्ये भेदभाव केला नाही. त्यामुळे हृषिकेश हा त्यांचा मुलगा नाही, हे कुणालाच कळलं नाही. मात्र, हे सत्य ऐश्वर्याला कळल्यावर तिने या गोष्टीचा चांगलाच फायदा घेतला आणि रणदिवे कुटुंबात आग लावण्याचं काम केलं. त्यामुळे आता कुटुंबात मोठे वाद होणार आहे.

ऐश्वर्याने अजूनही आपले कारस्थान रोखलेले नाही. आता ती सुमित्रा आईच्या मनात विष कालवण्याचं काम करणार आहे. इतकी वर्ष सुमित्रा आईने कधीच सावत्र भाव निर्माण होऊ दिला नव्हता. इतकंच काय तर, जेव्हा हृषिकेश आणि सगळ्यांना सत्य कळलं तेव्हा देखील सुमित्रा आईने सावत्र हा शब्द घरात वापरायचा नाही, अशी तंबी दिली होती. मात्र, आता ऐश्वर्या सावत्र हा शब्द न वापरता देखील घरात सावत्रपणाची भिंत बांधणार आहे. आता ऐश्वर्या सुमित्रा आईला एक असा फोटो दाखवणार आहे, ज्यामुळे सुमित्राआईच्या मनात संशयाची पाल चुकचुकणार आहे. इतकी वर्ष हृषिकेश हा एकटाच सगळा बिझनेस सांभाळत होता.

Tharala Tar Mag: प्रतिमा पहिल्यांदाच कुटुंबासोबत प्रेमानं वागणार; पूर्णा आजीला आनंद होणार! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

ऐश्वर्या पुन्हा निर्माण करणार नवा वाद!

मात्र, आता ऐश्वर्याच्या टोमण्यांमुळे आपलं सारंगवर अन्याय करतोय का? असा प्रश्न हृषिकेशच्या मनात आला होता. त्याने आता आपल्यासोबत सारंगला देखील ऑफिसमध्ये नेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता ऐश्वर्या हृषिकेशला कंपनीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आता ती सुमित्रा आईला एक असा फोटो दाखवणार आहे, जो बघून आईला मोठा धक्का बसणार आहे. या फोटोमध्ये कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत हृषिकेश बसलेला दिसत आहे. तर, सारंग खाली जमिनीवर बसलेला दिसत आहे. हा फोटो बघून सुमित्रा काहीही न बोलता ऑफिसमध्ये एक नवी खुर्ची पाठवणार आहे.

सुमित्रा आईच्या मनात संशय येणार?

दुसरीकडे, किचनमध्ये काम करत असताना जानकी सुमित्रा आईला याबद्दल विचारणार आहे. तर, सुमित्रा आईऐवजी आजी खोचक उत्तर देणार आहे. ‘ऑफिसमध्ये खुर्ची पाठवावी लागणारच नां.. तिकडे सारंगला सावत्र वागणूक जी मिळतेय’, आजीचं हे बोलणं ऐकून जानकीला वाईट वाटणार आहे. तर, सुमित्रा देखील काहीही न बोलता तिकडून निघून जाणार आहे. तर, सुमित्रा आई काहीच बोलल्या नाहीत म्हणजे त्यांना हे पटलं, असं वाटून आता जानकीला देखील मोठा धक्का बसणार आहे.