मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याच्या डावात जानकी अडकणार! नानांच सत्य समोर येणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याच्या डावात जानकी अडकणार! नानांच सत्य समोर येणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Jul 08, 2024 03:27 PM IST

Gharoghari Matichya Chuli 7 July 2024 Serial Update: नानांनी दोन लग्न केली होती आणि हृषिकेश हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे, हे सत्य आता ऐश्वर्याला कळलं आहे. याच सत्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या आता नवा डाव रचणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 7 July 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 7 July 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 7 July 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नामुळे सगळेच रणदिवे खूप खुश होते. मात्र, त्यांच्या या आनंदाला ऐश्वर्याने गालबोट लावलं आहे. ऐश्वर्या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठीच त्यांच्या घरात आली होती. त्यातच तिचं लग्न सौमित्र ऐवजी सारंगशी झाल्याने ती चांगली चिडलेली आहे. काहीही करून रणदिवेंना अद्दल घडवणार असा विडा तिने उचलला आहे. आता ऐश्वर्या तिला कळलेलं नानांचा सत्य लवकरच सगळ्यांसमोर आणणार आहे. त्यासाठी तिने जानकीला आपल्या डावात फसवले आहे.

नानांनी दोन लग्न केली होती आणि हृषिकेश हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे, हे सत्य आता ऐश्वर्याला कळलं आहे. याच सत्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या आता नवा डाव रचणार आहे. या प्लॅननुसार, ऐश्वर्या नाना आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो काहीही करून जानकीच्या किंवा घरातील कोणाच्याही समोर आला पाहिजे, याचा प्रयत्न करणार आहे आणि तिच्या या प्रयत्नाला देखील यश देखील मिळणार आहे. हिम्मतराव घरी नानांना भेटायला आले असताना, ऐश्वर्या त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येणार आहे. या हे लिंबू पाण्यात ऐश्वर्या औषध मिसळून आणणार आहे.

Tharala Tar Mag: सायलीच्या आनंदात अर्जुन होणार सहभागी! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

जानकीसमोर येणार सत्य!

या औषधामुळे आता हिम्मतराव घरी जायला निघताच, त्यांना चक्कर येणार आहे. हिम्मतरावांची तब्येत ठीक नाही, हे बघून जानकी त्यांना आश्रमापर्यंत सोडायला जाणार आहे. हिम्मतरावांना घेऊन निघालेली जानकी आता आश्रमात पोहोचणार असून, ती हिम्मतरावांना त्यांच्या घरापर्यंत देखील पोहोचवणार आहे. मात्र, हिम्मतरावांच्या घरात जाताच तिची नजर एका फोटोवर पडणार आहे. हा फोटो नाना रणदिवे यांच्या लग्नाचा आहे. मात्र, या फोटोत नानांसोबत आईऐवजी दुसरीच बाई दिसल्याने जानकी चांगलीच गोंधळात पडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आता धावत घरी येऊन जानकी नानांच्या आणि आईच्या लग्नाचा फोटो बघणार आहे. तेव्हा तिच्या लक्षात येणार आहे की, हिम्मतराव यांच्या घरात असलेल्या फोटो नानांसोबत एक वेगळीच महिला असून, ती आपली आई नाही. मग, ती बाई नक्की आहे कोण? असा प्रश्न जानकीला पडणार आहे. आता जानकी या फोटो मागचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत पुढे अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel