Gharoghari Matichya Chuli 6 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता अतिशय धक्कादायक वळण आले आहे. हृषिकेश आणि जानकी इतके दिवस ज्या पार्वती बाईंना शोधात होते, त्या पार्वती बाईंचं सत्य आता समोर आलं आहे. ऐश्वर्याने खेळलेल्या डावामुळे आता रणदिवेंच्या कुटुंबात मोठं वादळ आलं आहे. अखेर ऐश्वर्याला जे साध्य करायचं होतं, ते तिने केलं आहे. रणदिवेंचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा ऐश्वर्याचा मनसुबा आता सफल झाला आहे. ऐश्वर्याने हृषिकेश आणि जानकीपर्यंत हे सत्य अतिशय विचित्र पद्धतीने पोहोचवलं असून, यामुळे आता नाना आणि सुमित्रा आई सोबतच हृषिकेश आणि जानकी यांच्या नात्यातही काहीसा दुरावा आला आहे.
दुसरीकडे, इतकी वर्षे हृषिकेशपासून लपवलेली ही गोष्ट त्याला कळली म्हणजे आता तो मला परका झाला, त्याच्या मनात आता सावत्र भाव आला, हे देखील सुमित्रा आईला कळलं आहे. हृषिकेशने नानांवर आरोप लावल्यामुळे चिडलेल्या सुमित्रा आईने हृषिकेशच्या कानाखाली मारली होती. मात्र, आता तिला याच गोष्टीचा पश्चाताप होत आहे. हृषिकेशच्या मनात आता नक्कीच सावत्रपणा येणार आणि हृषिकेश माझ्यापासून दूर जाणार या भीतीने त्यांचा मन पोखरून निघत आहे.
तर, पार्वती बाईंचं सत्य कळल्यावर आणि आपण सुमित्रा आईचे सावत्र मुलगा आहोत, हे कळल्यानंतर आता हृषिकेशला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मात्र, ऐश्वर्या इतक्यात शांत बसलेली नसून, ती आता हृषिकेशला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. या घरात सावत्र हा शब्द उच्चारायचा नाही, असा हुकूम नानांनी केलेला आहे. मात्र, हा शब्द न उच्चारता देखील हृषिकेशला तो सावत्र असल्याची जाणीव कशी होईल याचा प्रयत्न ऐश्वर्या करत आहे. आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या हृषिकेश ऐश्वर्याच्या या डावामुळे पार कोलमडून जाणार आहे.
मुद्दाम हृषिकेशला ऐकू जाईल अशा ठिकाणी उभे राहून ऐश्वर्या कुणाला तरी सारंगवर घरात अन्याय होत असल्याचं सांगणार आहे. ‘सारंगला कोणी ऑफिसमध्ये नेत नाही, त्याला इथं शेतीच्या कामात जुंपलं आहे’, असं ऐश्वर्या फोनवर सांगत असते. तिचं हे बोलणं हृषिकेशच्या कानावर पडतात. आपण आपल्या भावावर अन्याय करतोय का? त्याला आपण सावत्र वागणूक देतोय का?, असा प्रश्न आता हृषिकेशच्या मनात उभा राहणार आहे. आणि यामुळे तो आणखीनच खचून जाणार आहे. तर, जानकीला ऐश्वर्याचा हा डाव आता कळणार आहे. मात्र, पार्वती आईचं सत्य कळल्यानंतर हृषिकेश इतकाच धक्का जानकीला देखील बसला आहे. मात्र, यातही जानकी आपल्या पतीची म्हणजेच हृषिकेशची साथ देताना दिसणार आहे.