मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: आईचा नकार; तरीही नाना हृषिकेशला सत्य सांगणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Gharoghari Matichya Chuli: आईचा नकार; तरीही नाना हृषिकेशला सत्य सांगणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Jul 05, 2024 01:47 PM IST

Gharoghari Matichya Chuli 5 July 2024 Serial Update: नाना रणदिवे स्वतः देखील हे सत्य सगळ्यांपासून लपवून थकले आहेत. नाना स्वतः हृषिकेशला हे सत्य सांगू पाहत आहेत.

Gharoghari Matichya Chuli 5 July 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 5 July 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 5 July 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता आजीने ऐश्वर्याला सत्य सांगितले आहे. त्यामुळे आता रणदिवे कुटुंबात मोठा गदारोळ माजणार आहे. नाना साहेबांनी हृषिकेश आपल्या पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याचं सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे. इतकंच काय तर, हे सत्य स्वतः हृषिकेश याला देखील माहित नाही. त्यामुळे सगळेच आजवर गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, आता ऐश्वर्या आता या सुखी कुटुंबाला नजर लावणार आहे. नानांचं सत्य कळल्यानंतर आता ऐश्वर्या याचा चांगलाच फायदा घेणार आहे. याच मुद्द्याला धरून आता ऐश्वर्या तिचा नवा डाव रंगवणार आहे.

एकीकडे नाना रणदिवे स्वतः देखील हे सत्य सगळ्यांपासून लपवून थकले आहेत. नाना स्वतः हृषिकेशला हे सत्य सांगू पाहत आहेत. मात्र, आईने स्वतः यासाठी नकार दिला आहे. आईने नेहमीच हृषिकेशला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलं आहे. आजवर त्यांनी कधीच हृषिकेशला सत्य कळू दिलेलं नाही. मी तुझी खरी आई नाही, हे सत्य त्यांनी कधीच हृषिकेशला जाणवू देखील दिलं नाही. नाना हिंमतरावांकरवी पार्वती अनाथ आश्रमाला दर महिना मोठी देणगी देतात, हीच गोष्ट ऐश्वर्याला खटकत होती. त्यामुळे ती याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिला आजी सगळं सत्य सांगणार आहे.

Justin Bieber: मुंबईत आला जस्टिन बीबर; २०० कोटींच्या बंगल्यात राहणारा गायक अंबानींच्या लग्नात गाणार!

नाना हृषिकेशला सत्य सांगणार?

दुसरीकडे, नाना देखील हे सत्य आता हृषिकेशला सांगुया, असे आईला म्हणत होते. मात्र, हृषिकेशला काहीही सांगू नका, त्याला वाईट वाटेल, असं म्हणत आई नानांना थांबवते. आता हृषिकेशच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. ओवीच्या हट्टामुळे तिच्या आई-वडिलांचा म्हणजेच हृषिकेश आणि जानकीचा लग्नसोहळा पुन्हा एकदा पार पडणार आहे. रणदिवेंच्या घरात सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे सगळेच खूप आनंदात आहेत. मात्र, ऐश्वर्याला हा आनंद बघवत नाहीये. त्यामुळे ऐश्वर्या आता आनंदावर विरजण घालणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऐश्वर्या कोणता नवा डाव खेळणार?

आजीकडून मिळालेली माहिती घेऊन आता ऐश्वर्या काय नाव डाव आखणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. परंतु, त्याआधी ऐश्वर्या मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून पळ काढताना दिसली आहे. आता ऐश्वर्या घरी कधी परत येते याची वाट जानकी बघतच होती. ती ऐश्वर्या आल्यावर तिच्याकडे प्रसादाची मागणी करणार आहे. मात्र, मंदिरात गेलीच नसल्यामुळे ऐश्वर्याकडे तिला देण्यासाठी प्रसाद देखील नसणार आहे. आता ऐश्वर्या जानकीच्या प्रश्नांमध्ये अडकणार आहे. आता ती पुढे काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

WhatsApp channel
विभाग