Gharoghari Matichya Chuli 28 June 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आज प्रेक्षकांना चांगलाच ड्रामा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आज सौमित्रचं लग्न पाहायला मिळणार आहे. तर, दुसरीकडे ऐश्वर्याने सौमित्रचं लग्न होऊ द्यायचं नाही, असा विडा उचलला आहे. दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना देखील सौमित्रने ऐश्वर्याला लग्नाला होकार दिला होता. मात्र, ऐन लग्नाच्यावेळी त्याने आपल्या दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचं म्हणत लग्न मोडलं होतं. यामुळे ऐश्वर्याला नाखुशीनेच सारंगशी लग्न करावं लागलं होतं. यामुळे तिचा सौमित्रावर प्रचंड राग आहे. त्यामुळेच सौमित्रचं अवंतिकाशी लग्न होऊ द्यायचं नाही, असा निर्णय तिने घेतला आहे.
सौमित्र आणि अवंतिका हे दोघे मंदिरात जाऊन लग्न करणार असल्याची गोष्ट आता ऐश्वर्याला कळली आहे. ऐश्वर्या आणि सारंग जेवण्यासाठी बाहेर गेलेले असताना, नेमके ते त्याचं हॉटेलमध्ये जातात, जिथे सौमित्र आणि अवंतिका देखील जेवणासाठी आलेले असतात. सौमित्र आपल्या हाताने अवंतिकाला भरवतोय हे पाहून ऐश्वर्या चांगलीच संतापते. यानंतर ऐश्वर्या हॉटेलमध्ये चांगलाच तमाशा सुरू करते. यामुळे तिथे चांगलीच गर्दी जमते. त्यावेळी सारंग कसाबसा ऐश्वर्याला घेऊन तिथून निघून जातो. मात्र, त्यालाही मनातून खूप वाईट वाटलेले असते. आता घरी आल्यावर सौमित्र कधी लग्न करणार याची खबर काढण्यासाठी ऐश्वर्या जानकीच्या रुमच्या दाराला कान लावून राहणार आहे.
दुसरीकडे मनातून दुखावलेला सारंग जानकी वहिनीला हॉटेलमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगणार आहे. यावेळी रागात ऐश्वर्याने सौमित्रचं लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे देखील सारंग जानकीला सांगतो. त्यामुळे आता जानकी आधीपासूनच ऐश्वर्यापासून सावध राहिली आहे. आईला सौमित्रच्या लग्नाबद्दल सांगताना देखील ती लग्न दोन दिवसांनी असल्याचं सांगणार आहे. ऐश्वर्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असणार, ही गोष्ट तिला चांगलीच माहित होती. म्हणूनच ती आईला खोटं सांगते. तर, ऐश्वर्या देखील या खोट्याला खरं मानते आणि आरामात राहते.
आता जानकी आणि हृषिकेश दोघेही खोटं कारण सांगून आईला घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्यावेळी वहिनी अजून घरी कशी आली नाही, हे विचारण्यासाठी सौमित्र जानकीला फोन करणार आहे. मात्र, जानकी तिचा फोन घरीच विसरून आली आहे. तीच फोन आता आजी ऐश्वर्याला देणार आहे. तर, सौमित्रचं लग्न आज आहे, हे कळल्यावर ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो. आता निवांत बसलेली ऐश्वर्या तातडीने नानांना घेऊन सौमित्र लग्न करत असलेल्या मंदिरात घेऊन जाणार आहे. आता पुढे काय ड्रामा होणार, हे येणाऱ्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या