मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: सौमित्रचं लग्न होऊच देणार नाही! ऐश्वर्याने उचलला विडा; जानकी शिकवू शकेल का धडा?

Gharoghari Matichya Chuli: सौमित्रचं लग्न होऊच देणार नाही! ऐश्वर्याने उचलला विडा; जानकी शिकवू शकेल का धडा?

Jun 27, 2024 03:01 PM IST

Gharoghari Matichya Chuli 27 June 2024 Serial Update: ऐश्वर्याचं लग्न सुरुवातीला सौमित्रशी होणार होतं. मात्र, त्याने आपलं दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचे म्हणत त्याने आयत्यावेळी ऐश्वर्याशी ठरलेलं लग्न मोडलं.

Gharoghari Matichya Chuli 27 June 2024 Serial
Gharoghari Matichya Chuli 27 June 2024 Serial

Gharoghari Matichya Chuli 27 June 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेत आता सौमित्र लग्न करताना दिसत आहे. तर, ऐश्वर्या आता त्याच लग्न कसं होणार नाही, याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्याचं लग्न सुरुवातीला सौमित्रशी होणार होतं. मात्र, त्याने आपलं दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचे म्हणत त्याने आयत्यावेळी ऐश्वर्याशी ठरलेलं लग्न मोडलं. सौमित्रच्या या वागण्यामुळे ऐश्वर्याला बळजबरीने मनाविरुद्ध सारंगशी लग्न करावं लागलं आहे. याचाच राग तिच्या मनात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

त्यामुळे आता सौमित्रच्या लग्नाची बातमी ऐकताच ऐश्वर्याचा पारा चांगलाच चढला आहे. संतापलेली ऐश्वर्या आता सौमित्रचं लग्न होऊ देणार नाही, असं म्हणून आता एक नवा डाव आखायला लागली आहे. बाजारात भाजी आणायला गेलेल्या ऐश्वर्या आणि जानकी यांना तिथे सौमित्र भेटला. यावेळी त्याने जानकीच्या हातात एक चिट्ठी देऊन ती एकट्यात वाचायला सांगितली. त्याच्या या वागण्यामुळे ऐश्वर्या आणखीनच चिडली. त्या नोटमध्ये नक्की काय लिहिले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता ऐश्वर्याला होती. मात्र, सौमित्र जानकी आणि हृषिकेश यांना भेटायला बोलवतोय ही माहिती ऐश्वर्याला मिळते. आता ही गोष्ट नानांना सांगायची, असे ऐश्वर्या ठरवते.

Tharala Tar Mag: कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल झाली गायब! गोत्यात आलेले सायली आणि अर्जुन आता काय करणार?

ऐश्वर्या करणार नाटक

जेवण्याच्या टेबलवर वाढत असताना ऐश्वर्या मुद्दामहून हातपाय थरथरत असल्याचं नाटक करते. आणि विचारल्यावर घाबरल्याचं सांगते. यावर नाना चिडून तिला काही प्रश्न विचारतात. त्यावेळी जानकी आणि हृषिकेश जेवायला कसे आले नाहीत, असा प्रश्न त्यांना पडतो. त्यावेळी ऐश्वर्या त्यांना सांगते की, दोघे सौमित्रला भेटायला गेले आहेत. हे ऐकून नाना चिडतात. मात्र, ऐश्वर्या आणखी काही आग लावण्याचा प्रयत्न करणार इतक्यात जानकी आणि हृषिकेश तिथे येतात. इतकंच नाही तर, सौमित्र लग्न करत असून, त्याने आपल्याला लग्नाला बोलवले असल्याचे ते सगळ्यांना सांगतात. मात्र, नाना यावर खूप संतापतात. कुणीही लग्नाला जायचं नाही, असं फर्मान ते काढतात.

जानकी लढवणार शक्कल

आता सौमित्र कधी लग्न करतोय, याच्ची माहिती ऐश्वर्याला हवी असते. मात्र, जानकी आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, हे तिला आधीच माहित होते. त्यामुळे ती जानकीच्या मागावर राहून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाना नाही म्हणाले असले, तरी हृषिकेश आणि जानकी आईकडे जाऊन तिला लग्नाला येण्याची मनधरणी करणार आहेत. त्यावेळी ऐश्वर्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जानकी मुद्दाम सौमित्र दोन दिवसांनी लग्न करत असल्याचे सांगणार आहे. ऐश्वर्या ऐकत आहे, हे जानकीला चांगलेच ठावूक होते. मात्र, जानकी लग्नाच्या दिवसाबद्दल खोटं का बोलतेय हे हृषिकेशला कळत नाही. आता जानकीचा हा डाव सफल होणार का? की ऐश्वर्या सौमित्रचं लग्न मोडणार? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel
विभाग