Gharoghari Matichya Chuli: रणदिवे कुटुंबाला मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण! ऐश्वर्या घालणार मोठा गोंधळ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: रणदिवे कुटुंबाला मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण! ऐश्वर्या घालणार मोठा गोंधळ

Gharoghari Matichya Chuli: रणदिवे कुटुंबाला मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण! ऐश्वर्या घालणार मोठा गोंधळ

Jun 26, 2024 03:01 PM IST

Gharoghari Matichya Chuli 26 June 2024 Serial Update: बाबांच्या प्रश्नांची उत्तरे देताना हृषिकेश त्यांना सौमित्र लग्न करत असल्याचा सांगणार आहे. इतकंच नाही, तर त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला लग्नासाठी बोलावलं असल्याचं देखील हृषिकेश सगळ्यांना सांगणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 26 June 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 26 June 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 26 June 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता एक रंजक वळण येताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ऐश्वर्या आणि सारंग यांना एकत्र आणण्यासाठी जानकी आणि हृषिकेश भरपूर प्रयत्न करत आहेत. ऐश्वर्याची सगळी खेळी समोर आल्यानंतर रणदिवे कुटुंबाने आपल्या मुलाला म्हणजेच सौमित्रला तर घराबाहेर होण्याची शिक्षा दिलीच. मात्र, ऐश्वर्याला त्यांनी सारंगसाठी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांच्या घरामध्ये ऐश्वर्या आता नवीन कारस्थान करायला सज्ज झाली आहे.

दुसरीकडे, जानकीने ऐश्वर्याला सुधरवण्याचा विडा उचलला आहे. म्हणूनच रोज ती ऐश्वर्याचा क्लास घेत आहे. रणदिवे कुटुंबाच्या घरातील सगळ्या कामांपासून ते परंपरापर्यंत सगळ्याच गोष्टी जानकी आता ऐश्वर्याला शिकवू पाहत आहे. मात्र, या दरम्यान सगळ्या कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. ऐश्वर्या आणि सौमित्र प्रकरणानंतर रणदिवे कुटुंबाने आपल्या मुलाला म्हणजेच सौमित्रला घरातून बेदखल केले होते. सौमित्र आता एकटाच राहत आहे. मात्र, आता तो लग्न करणार असून, त्याने आपल्या लग्नाचे निमंत्रण रणदिवे कुटुंबाला पाठवले आहे.

Tharala Tar Mag: जे घडायला नको तेच घडणार! अर्जुन-सायली नव्या संकटात अडकणार; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

ऐश्वर्या करणार चुगली!

जानकी ऐश्वर्याला घेऊन भाजी घेण्यासाठी बाजारात गेली असताना, तिकडे तिला सौमित्र आणि त्याची होणारी पत्नी दिसतात. त्यावेळी सौमित्र आपल्या वहिनीला म्हणजे जानकीला आपल्याला भेटायला येण्याची विनंती करतो. सौमित्रच्या विनंतीवरून जानकी आणि हृषिकेश दोघेही त्याला भेटण्यासाठी जातात. मात्र, बाबांच्या निर्णयानंतर देखील जानकी आणि हृषिकेश सौमित्रला भेटायला गेलेलं आहेत, ही गोष्ट ऐश्वर्या सगळ्यांना सांगणार आहे. यामुळे रणदिवे कुटुंबातील काही मंडळी चांगलीच संतापली आहेत. मात्र, हे सुरू असताना जानकी आणि हृषिकेश घरी परतणार आहेत.

रणदिवेंना मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण!

आता बाबा दोघांनाही सौमित्रला का भेटायला गेलात, असा प्रश्न करणार आहेत. तर बाबांच्या प्रश्नांची उत्तरे देताना हृषिकेश त्यांना सौमित्र लग्न करत असल्याचा सांगणार आहे. इतकंच नाही, तर त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला लग्नासाठी बोलावलं असल्याचं देखील हृषिकेश सगळ्यांना सांगणार आहे. मात्र, कोणीही सौमित्रला भेटायला किंवा त्याच्या लग्नाला जायचं नाही, असा निर्णय बाबांनी घेतला असून, ते प्रत्येकाला यासंबंधी सूचना करणार आहेत. यामुळे आता जानकी आणि हृषिकेश चांगलेच अडचणी सापडले आहेत. कोर्टात लग्न करण्यासाठी सौमित्रच्या बाजूने जानकी आणि हृषिकेशने येण्याचे वचन दिले होते. आता हे वचन ते कसे पूर्ण करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner