मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्या संधी साधणार! सौमित्रच्या लग्नामुळे जानकी आणि हृषिकेश अडचणीत येणार?

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्या संधी साधणार! सौमित्रच्या लग्नामुळे जानकी आणि हृषिकेश अडचणीत येणार?

Jun 25, 2024 02:18 PM IST

Gharoghari Matichya Chuli 25 June 2024 Serial Update: वट पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा एकदा जानकीला त्रास देण्यासाठी नवीन प्लॅन करताना दिसणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 25 June 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 25 June 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 25 June 2024 Serial Update: घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या आजच्या भागात वट पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा एकदा जानकीला त्रास देण्यासाठी नवीन प्लॅन करताना दिसणार आहे. जानकी आणि ऐश्वर्या दोघीही वटपौर्णिमेची पूजा करून निघत असताना, तिथे सौमित्र त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आलेला पाहून ऐश्वर्या चिडणार आहे. ऐश्वर्याला सौमित्रशी लग्न करायचं होतं. मात्र, सौमित्र आधीच एका मुलीवर प्रेम करत असल्यामुळे, त्याने या लग्नास नकार दिला होता. या सगळ्या ड्रामानंतर सौमित्रलाच सगळ्यांनी घराबाहेर काढलं होतं. रणदिवे कुटुंबाने सौमित्रशी असलेलं नातं देखील तोडलं आहे. त्यामुळे सौमित्र वेगळा राहत आहे.

सौमित्रला समोर पाहून ऐश्वर्याचा पारा चांगला चढला होता. तिने सौमित्रच्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली मारली, हे पाहून जानकी थक्क झाली होती. आता जानकीला फसवण्यासाठी ऐश्वर्याकडे चांगलीच संधी चालून आली आहे. जानकी आणि हृषिकेश हे अजूनही सौमित्रला मदत करत आहेत, ही गोष्ट कळल्यावर ऐश्वर्या आता घरी जाऊन यावरूनच नाटक करणार आहे.

Tharala Tar Mag: प्रियाची चोरी पकडण्यात चैतन्य आणि अर्जुनला मिळणार का यश? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

ऐश्वर्या संधीचा फायदा घेणार!

रणदिवे कुटुंब जेवायला बसले असताना हृषिकेश आणि जानकी दिसत नाही, त्यामुळे आता बाबा, ते दोघे कुठे गेले आहेत? असा प्रश्न करणार आहेत. तर, उगाच खोटं खोटं घाबरल्याचा ढोंग करत ऐश्वर्या, ‘जानकी वहिनी आणि हृषिकेश दादा दोघेही सौमित्रला भेटायला गेले आहेत, मात्र, त्यांनी तुम्हाला सांगण्यास मनाई केली आहे’, असं सगळ्यांना सांगणार आहे. जानकी आणि हृषिकेश हे आपल्या वचनाच्या पुढे कसे गेले?, असे म्हणत बाबा देखील चिडणार आहेत. दुसरीकडे, सौमित्र त्याच्या लग्नाची तयारी करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सौमित्र लग्न करणार?

सौमित्र, हृषिकेश आणि जानकीला सांगतो की, ‘उद्या मी लग्न करत आहे. तिच्याकडून तिचे आई-बाबा आणि त्यांच्या कुटुंबातील काही मित्रमंडळी येणार आहेत. माझ्या बाजूने तुम्ही दोघे येणार ना?’, असं म्हणत तो दोघांनाही आपल्या लग्नाला हजर राहण्यासाठी सांगणार आहे. मात्र, सौमित्रचा हा निर्णय ऐकून जानकी आणि हृषिकेश यांना मोठा धक्का बसला आहे. जर, आपण सौमित्रला साथ दिली, तर वडिलांच्या वचनाचा अपमान होईल, याची दोघांनाही चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे जानकी आणि हृषिकेश यांना कुठलही पुढचं पाऊल उचलताना विचार करावा लागणार आहे. मात्र, सौमित्रच्या लग्नामुळे आता जानकी आणि हृषिकेश चांगलेच गोत्यात येणार आहेत.

WhatsApp channel
विभाग