Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याचा डाव फसला; जानकी-हृषिकेशसमोर सत्य आलंच नाही! मालिकेत पुढे काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याचा डाव फसला; जानकी-हृषिकेशसमोर सत्य आलंच नाही! मालिकेत पुढे काय घडणार?

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याचा डाव फसला; जानकी-हृषिकेशसमोर सत्य आलंच नाही! मालिकेत पुढे काय घडणार?

Published Jul 25, 2024 03:26 PM IST

Gharoghari Matichya Chuli 25 July 2024 Serial Update:ऐश्वर्याचा डाव फसलेला असून हिम्मतराव ही सगळी माहिती नानासाहेबांना देणार आहेत. तर, सगळं विसरून जानकी आणि हृषिकेश आपल्या संगीत सोहळ्यात व्यस्त होणार आहेत.

Gharoghari Matichya Chuli 25 July 2024 Serial Update
Gharoghari Matichya Chuli 25 July 2024 Serial Update

Gharoghari Matichya Chuli 25 July 2024 Serial Update:घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमध्ये सध्या चांगलीच गडबड पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या सतत काहीना काही करून जानकी आणि हृषिकेश यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्याने मुद्दाम जानकी आणि हृषिकेश यांना एका बहाण्याने आश्रमात जाऊन त्या कपाटातील फाईल शोधून काढण्यास सागितलं होतं. या फाईलमध्ये हृषिकेशच्या जन्माचा पुरावा असल्याचा म्हटलं होतं. हळद लावल्यानंतरही हृषिकेश आणि जानकी हाच पुरावा शोधण्यासाठी आश्रमात पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी ऐश्वर्याने पोलीस असलेल्या अंकुशला फोन करून आश्रमावर दरोडा पडल्याची खबर दिली. त्यामुळे अंकुश देखील आपल्या ताफ्यासह आश्रमात दाखल झाला होता.

जानकी आणि हृषिकेश फाईल शोधत असताना, अंकुश तिथे पोहोचला. मात्र, दरोड्याऐवजी तिथं जानकी आणि हृषिकेश होते, हे बघून त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्याने जानकी आणि हृषिकेशला तुम्ही यावेळी इथे काय करता असा विचारलं. त्यावर जानकीने घडला सगळा प्रकार अंकुशला सांगितला. या फाईलमध्ये ऋषिकेशी संबंधित काहीतरी माहिती आहे आणि ती आम्हाला हवी आहे, म्हणून आम्ही इथं घाईघाईने आलो असं जानकीने अंकुशला सांगितलं. तितक्यात हिम्मतराव देखील तिकडे आले.

Bigg Boss OTT 3: ‘वीकेंड का वार’मध्ये धमाका होणार! यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’मधून कोण बाहेर जाणार? नाव आलं समोर!

काय आहे त्या फाईलमध्ये?

हृषिकेश आणि जानकीला आश्रमात पाहून हिम्मतराव घाबरूनच गेले. त्यावेळी हृषिकेशने आपल्याला एकदा ती फाईल चेक करू द्या, असं म्हटलं. जानकी आणि हृषिकेश यांनी आश्रमातील ती फाईल चेक केली. मात्र, त्या फाईलमध्ये केवळ डोनेशनचे कागदपत्र होते. यावर हिम्मतराव त्यांना म्हणाले की, ‘नानासाहेब दर महिन्याला काही पैसे देता हे आश्रम चालवण्यासाठी.. त्याचाच हा सगळा तपशील आहे. तुम्हाला काही वेगळे अपेक्षित होतं का?’ यावर जानकी आणि हृषिकेश दोघेही गप्प बसतात. यानंतर हिम्मतराव दोघांनाही सांगतात की, ‘हा आश्रम पार्वतीच्या नावाने सुरू करण्यात आला आहे. पार्वती ही माझी बहीण होती’, असं बोलून हिम्मतराव दोघांनाही आपल्या खोलीत घेऊन जातात.

फोटोचं सत्य समोर येणार?

त्यावेळेस जानकीच्या लक्षात येतं की, आपण येथे नानांचा एका दुसऱ्याच बाईसोबत फोटो पाहिला होता. जानकी यासंदर्भात हिम्मतरावांना विचारू लागते. त्यावर हिम्मतराव म्हणतात की, तू हाच फोटो पाहिला होतास का? तेव्हा तिचं लक्ष भिंतीकडे जातं, तर त्या भिंतीवर नाना आणि सुमित्रा आईंचा फोटो लावलेला असतो. यावर हिम्मतराव तिला म्हणतात की. तू नजर चुकीने दुसऱ्या कुठल्यातरी फोटोच्या ऐवजी या फोटोची कल्पना केली असशील. गेल्या चाळीस वर्षापासून हा फोटो इथेच आहे. कुणीतरी नानासाहेबांची मुद्दामहून बदनामी करतंय. आता ऐश्वर्याचा हा डाव फसलेला असून हिम्मतराव ही सगळी माहिती नानासाहेबांना देणार आहेत. दुसरीकडे हे सगळं विसरून जानकी आणि हृषिकेश आपल्या संगीत सोहळ्यात व्यस्त होणार आहेत.

Whats_app_banner