Gharoghari Matichya Chuli 24 June 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्याने आलेल्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेतील जानकी आणि हृषिकेश यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेत सध्या वट पौर्णिमेचा सण साजरी होताना दिसत आहे. यात आता हृषिकेश आणि जानकी यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे जानकीने ह्रषिकेशसाठी वट पौर्णिमेचं व्रत करत केलं आहे, त्याचं प्रमाणे हृषिकेश देखील जानकीसाठी हे व्रत करणार आहे. जानकीच मला पुढच्या सात जन्मी पत्नी म्हणून हवी, असे म्हणत हृषिकेश वडाला फेऱ्या मारताना दिसणार आहे. मात्र, त्यांच्या या व्रतात आता ऐश्वर्या मोडता घालताना दिसणार आहे.
ऐश्वर्याचे सगळे प्रताप समोर आल्यानंतर आता रणदिवे कुटुंबाने तिला घरातून बेदखल करून शिक्षा दिली होती. मात्र, सारंगच्या मनाची घालमेल बघून सगळ्यांनीच ऐश्वर्याला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जानकी स्वतः ऐश्वर्याला अद्दल घडवणार आहे. रणदिवे कुटुंबाच्या या घरातील सगळे कायदे जानकी ऐश्वर्याला शिकवणार आहे. ऐश्वर्याने सगळ्यांची माफी मागण्याचं खोटं नाटक केलंय, हे जानकीला चांगलंच ठावूक आहे. मात्र, तरीही जानकी सारंगसाठी ऐश्वर्याला सुधरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रणदिवेंच्या घरात महिला वर्ग वट पौर्णिमेसाठी तयार झालेला पाहायला मिळाला होता. आता सगळ्या जणी मिळून वट पौर्णिमेच्या पूजेसाठी निघणार आहेत. यावेळी ऐश्वर्या देखील तयार होणार आहे.
हृषिकेश दादा प्रमाणेच सारंग देखील ऐश्वर्यासाठी व्रत करणार आहे. तर, मी सगळं जानकी वहिनीसारखं करणार, असं ऐश्वर्याने म्हटलं आहे. मात्र, जानकीचा वट पौर्णिमेचा उपास हा अतिशय कडक असतो. ती काहीच खात नाही आणि पाणीही पीत नाही, असे सगळेच ऐश्वर्याला सांगतात. मात्र, तरीही ऐश्वर्या जानकीची जागा मिळवण्यासाठी हा प्रयत्न करते. परंतु, तिला तिची भूक आवरता येत नाही. खाण्याच्या शोधात असलेली ऐश्वर्या आता घरात शोधाशोध करू लागणार आहे. त्यावेळी तिला एका टोपलीत फळं दिसणार आहेत. भुकेलेली ऐश्वर्या ती फळं उचलून खाऊ लागणार आहे. मात्र, ही फळं शोभेची म्हणजेच मातीची असल्याने आता जानकी ऐश्वर्याला सुनावणार आहे.
जानकीवरचा राग काढण्यासाठी आता ऐश्वर्या त्यांच्या वट पौर्णिमेच्या व्रतात मोडता घालण्याचा प्रयत्न करणार आहे. जानकी आणि हृषिकेश वडाची पूजा करत असताना ऐश्वर्या मुद्दाम हृषिकेशच्या पायात अडकून दोर तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, हृषिकेश वेळीच ऐश्वर्याला सावरणार आहे. त्यामुळे ऐश्वर्याचा हा प्रयत्न हुकणार आहे.
संबंधित बातम्या