Gharoghari Matichya Chuli: सत्य शोधण्यात जानकीला मिळणार हृषिकेशची साथ! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: सत्य शोधण्यात जानकीला मिळणार हृषिकेशची साथ! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

Gharoghari Matichya Chuli: सत्य शोधण्यात जानकीला मिळणार हृषिकेशची साथ! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज काय घडणार?

Published Jul 18, 2024 03:05 PM IST

Gharoghari Matichya Chuli 18 July 2024: आपल्याला पीपीआर आश्रमात जाऊन त्या कपाटातील ती फाईल शोधून काढलीच पाहिजे. त्या फाईलमध्ये तुमच्या जन्माचं काहीतरी सत्य लपवलेलं आहे, असं जानकी हृषिकेशला सांगणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 18 July 2024
Gharoghari Matichya Chuli 18 July 2024

Gharoghari Matichya Chuli 18 July 2024:  ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आजच्या भागात हृषिकेश आणि जानकी यांची हळद पार पडणार आहे. हळदी पूर्वी जानकीच्या घरात सामान ठेवायला आलेल्या एका व्यक्तीने पुन्हा एकदा तिला थांबवून आश्रमात जाऊन कपाटातील लाल फाईल चेक करण्याचा सल्ला दिला होता. आता या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार जानकी आश्रमात जाण्याचं धाडस करणार आहे. मात्र, हळद लागल्यामुळे घरातून बाहेर कसं पडायचं, हा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा राहणार आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. या मेहंदी सोहळ्यामध्ये देवाला नारळ ठेवत असताना ऐश्वर्याने केलेल्या कटामुळे शरूच्या साडीला आग लागली आणि ही आग विझवण्याच्या नादात जानकीच्या हातावरची सगळी मेहंदी पुसली गेली. 

मात्र, तिच्या हातावरचे हृषिकेश हे नाव रंगल्यानं ते तसंच टिकून राहिलं. त्यामुळे हृषिकेशने सगळ्यांची मन धरणी करून हा सोहळा पुढे नेण्याचं कर्तब करून दाखवलं. मात्र, या दरम्यान त्या माणसाने येऊन दिलेल्या सल्ल्यामुळे जानकी अस्वस्थ झाली आहे. जानकी आणि हृषिकेश दोघांच्याही लग्न सोहळ्यात ऐश्वर्या अनेक वेगवेगळी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. जानकीची ही अस्वस्थता हृषिकेशच्या नजरेतून सुटत नाही. हृषिकेश पुन्हा एकदा जानकीकडे याबद्दल विचारणा करताना दिसणार आहे. तर यावेळी जानकी देखील हृषिकेशपासून काहीही न लपवता  त्याला सगळं सांगणार आहे. 

Tharala Tar Mag: अर्जुनसोबत प्रिया जाणार का अलिबागला? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार धमाकेदार वळण

सत्य समोर येणार?

आपल्याला पीपीआर आश्रमात जाऊन त्या कपाटातील ती फाईल शोधून काढलीच पाहिजे. त्या फाईलमध्ये तुमच्या जन्माचं काहीतरी सत्य लपवलेलं आहे, असं जानकी हृषिकेशला सांगणार आहे. त्यामुळे आता हृषिकेश देखील जानकीला साथ देणार आहे. जानकी आणि हृषिकेश दोघेही सगळ्यांची नजर चुकवून रात्री आश्रमात शिरकाव करणार आहेत. हातात बॅटरी धरून हळूच कपाट उघडून फाईल शोधत असतानाच हृषिकेश आणि जानकी आता पकडले जाणार आहेत. त्या ठिकाणी अंकुश येऊन दोघांनाही चोर समजून पकडणार इतक्यात लाईट लागल्याने ते जानकी आणि हृषिकेश असल्याचं समोर येणार आहे. मात्र, एवढ्या रात्री जानकी आणि हृषिकेश आश्रमात नक्की काय करतायत? असा प्रश्न सगळ्यांनाच पडणार आहे. या दरम्यान हृषिकेशच्या जन्माचे सत्य सांगणारी ती फाईल  दोघांच्या हाती लागेल का आणि या फाईलमधलं सत्य सगळ्यांसमोर येईल का? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner