Gharoghari Matichya Chuli 16 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. रणदिवेंच्या घरात आता जानकीचा मेहंदी सोहळा सुरू आहे. या दरम्यान ऐश्वर्या आता एक नवा प्लॅन रचून तिची मेहंदी खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्याने आपल्या प्लॅननुसार बहीण संजनाला मेहंदी घेऊन बोलावले होते. मात्र, इकडे जानकी दचकल्यामुळे तिच्या हातातली मेहंदी पडून खराब झाली होती. इतक्यातच ऐश्वर्या आणि संजना मेहंदी घेऊन आल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
सुमित्राआईने ऐश्वर्याला प्रश्न देखील केला की, ‘मेहंदी खाली पडणार होती, हे तुला आधीच कसं काय कळलं? तू जास्तीची मेहंदी कशी काय आणलीस?’ हे ऐकताच ऐश्वर्याही भांबावली. मेहंदी जानकीच्या चुकीने पडली असली तरी, याची ऐश्वर्याला काहीच कल्पना नव्हती. पुढे जाऊन आपण जानकीची मेहंदी खराब करायची, याच उद्देशाने आधीच तिने जास्तीची मेहंदी मागवली होती. इतकंच नाही, तर या मेहंदीच्या पाकिटावर काहीतरी मेसेज लिहून तो जानकीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करत होती. ऐश्वर्याने सुमित्रा आईला उत्तर देताना असं म्हटलं की, ‘लग्न घर आहे, म्हणजे काही गोष्टी कमी पडू शकतात. ते होऊ नये म्हणून मी आधीच जास्तीची मेहंदी संजना ताईला आणायला सांगितली. जानकी वहिनीची शिकवण आता माझ्यात चांगली चांगली उतरली आहे. त्यामुळेच मी ही हुशारी केली.’
यावर सगळे तिचं कौतुक करू लागतात आणि ऐश्वर्याने आणलेली मेहंदी जानकी भिजवण्यासाठी घेऊन जाते. मेहंदी भांड्यात काढत असताना, जानकीला त्यावर एक मेसेज लिहिलेला दिसतो. त्या मेसेजमध्ये तिला सुमित्रा इंटरप्राईजेसचे अकाउंट चेक कर, असे म्हटले गेले आहे. त्यानंतर जानकी तडक हृषिकेशचा लॅपटॉप घेऊन अकाउंट डिटेल चेक करणार आहे. तर, दुसरीकडे हृषिकेशच्या फोनवर देखील एक मेसेज येतो, ज्या असे लिहिलेले असते की, तुमची जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर हृषिकेश देखील खोलीत जातो. तेव्हा जानकी तिथे बसून त्याचा लॅपटॉप तपासत असते.
आता यामुळे दोघांमध्ये काहीसे गैरसमज निर्माण होणार आहेत. मात्र, ते वेळीच सुटणार असून, दोघेही मेहंदीसाठी एकत्र खाली जाणार आहेत. आपला हा डाव फसला हे लक्षात येताच ऐश्वर्या तिच्या दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहे. जानकी आणि ऐश्वर्या देवपूजा करत असताना ऐश्वर्या मुद्दाम तिच्या साडीचा पदर देवाच्या दिव्याशी लावून तो जाळण्याचा प्रयत्न करते. तर याकडे लक्ष जाताच आपल्या हातावरच्या ओल्या मेंदीचा विचार न करता जानकी हातांनीच आग विझवते. या आग विजवण्याच्या वेळी जानकीच्या हातावरची मेहंदी पुसून जाते. यामुळे आता अपशकून झाला अशी ओरड आजी करणार आहे.
संबंधित बातम्या