Gharoghari Matichya Chuli 16 August 2024 Serial Update: सध्या मालिका विश्वात ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेत अनेक भावनिक बंध उलगडताना दिसत आहेत. मात्र, आता या मालिकेत अतिशय धक्कादायक वळण येताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे आधीच रणदिवे कुटुंबातून अनेक नाते दुरावली आहे. आधीच सौमित्रला नानांनी घरातून बेदखल केले आहे. सौमित्रचे लग्न सुरुवातीला ऐश्वर्यासोबत ठरवण्यात आलं होतं. सौमित्रने अवंतिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. सौमित्रचं हेच वागणं नाना रणदिवे यांना खटकलं आणि त्यांनी सौमित्र म्हणजेच स्वतःच्या मुलाला आपल्याला घरातून बेदखल केलं. लग्न मोडल्यानंतर ऐश्वर्याचे सारंगशी लग्न ठरवण्यात आलं. मात्र, यामुळेच ऐश्वर्या प्रचंड चिडली आहे. ऐश्वर्याला सारंगशी लग्न करायचं नव्हतं. जबरदस्तीने तिला हे लग्न करावं लागलं. मात्र, सारंगशी लग्न करून बायको म्हणून रणदिवे कुटुंबात आल्यावर या सगळ्यांकडूनच बदला घेत आहे.
यातच सारंगच्या झालेला अपघातामुळे आता तिला आणखी एक नवा डाव साधण्याची संधी मिळाली आहे. जन्माचे सत्य सगळ्यांसमोर आणलं होतं. नाना रणदिवे, त्यांची पहिली पत्नी पार्वती आणि तिचा मुलगा हृषिकेश हे सगळं सत्य बाहेर आल्यानंतर हृषिकेश तर खचून गेलाच. मात्र, अवघ्या रणदिवे कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे. सुमित्रा आई आणि नानांना याची माहिती होती. मात्र, ऐश्वर्याच्या डावामुळे आता हे सत्य सगळ्यांसमोर आलं आणि रणदिवे कुटुंबात फूट पडायला सुरुवात झाली. यातच कंपनीच्या एका सेमिनारसाठी बंगळुरूला जायला निघालेल्या सारंगचा अपघात झाला आहे.
तो प्रवास करत असलेला ट्रेनचे डबे नदीत पडले आणि या अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. हृषिकेश आणि जानकी दोघेही सारंगला शोधण्याचा कसोशीन प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी तुम्ही आशा सोडून द्या आता सारंग सापडणार नाही, असं म्हटल्यानं दोघांनाही मोठा धक्का बसला तर हीच गोष्ट ऐकल्याने सुमित्रा आईला देखील हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर सुमित्राआई देखील जानकीशी फटकून वागायला लागली आहे. दुसरीकडे, हृषिकेश मात्र आपल्या भाऊ गेला असेल, हे मानायला कबूल नाही. या अपघातात जखमी झालेली काही लोकांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, ते कळताच आता हृषिकेश सगळं हॉस्पिटलमध्ये जाऊन सारंग तिकडे आहे का, हे तपासणार आहे.
त्याचवेळी हृषिकेशला सारंग जखमी अवस्थेत दिसणार आहे. हृषिकेश तातडीने सारंगला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. तिथे गेल्यावर ‘सारंगचं खूप रक्त गेल्याने त्याचा जीव वाचवणं कठीण आहे. यातच त्याचा रक्तगट देखील अतिशय दुर्मिळ असल्याने या रक्तगटाचा कोणी आता सापडत देखील नाहीये’, असं डॉक्टर म्हणणार आहे. सारंगचा रक्तगट ओ निगेटिव्ह असल्याने तो कोणाशीच जुळत नाहीये. यामुळे आता सगळेच हतबल झाले आहेत. मात्र, आता आपल्या भावाच्या मदतीला भाऊच धावून येणार आहे. आयत्यावेळी हॉस्पिटलमध्ये सौमित्र येऊन माझा ब्लड ग्रुप देखील ओ निगेटिव्ह असल्याचं, सांगणार आहे. त्यामुळे आता सारंगचा जीव वाचवणं शक्य होणार आहे.