Gharoghari Matichya Chuli 13 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता आणखी एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सारंगच्या अपघातासोबतच आणखी एक वाईट बातमी समोर येणार आहे. सारंग प्रवास करत असणाऱ्या ट्रेनचा अपघात झाल्याचे ऐकताच, आणि सारंगचं त्यात काही वाईट झालंय हे कळताच आता सुमित्रा आईला हृदयविकाराचा झटका येणार आहे. यामुळे आता रणदिवे कुटुंबात मोठं वादळ येणार आहे. सारंगला बंगळुरुला पाठवण्याचा निर्णय जानकीचा होता. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचं खापर जानकीवर फुटणार आहे.
हृषिकेश आणि जानकी यांच्यावर आधीच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाना आणि पार्वती आईचं सत्य समोर आल्यावर हृषिकेशला आधीच मोठा धक्का बसला आहे. हृषिकेशच्या जन्माचं सत्य समोर आल्यानंतर आता रणदिवे कुटुंबात ऐश्वर्याने सावत्रपणाचा खेळ मांडला आहे. यात ती मुद्दामहून सुमित्रा आईच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे ती हृषिकेशच्या आधीच जखमी असलेल्या मनावर आणखी आघात होतील अशी व्यक्तव्य करत आहे. ऐश्वर्यानेच काही टोमणे मारून हृषिकेशच्या मनात सारंगला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचं बीज रोवलं होतं. त्यामुळे आता हृषिकेशने आपली कंपनी सारंगच्या हातात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हृषिकेश सारंगला कंपनी सांभाळण्याचं प्रशिक्षण देत आहे. यात आता एका खास सेमिनारसाठी हृषिकेशला बंगळुरूला जावं लागणार होतं. या सेमिनारमध्ये हृषिकेश दरवर्षी प्रेझेन्टेशन देतो. त्यामुळे हृषिकेशचं बंगळुरूला जाण्याचं विमानाचं तिकीट आधीच बुक करण्यात आलं होतं. तर, आयत्यावेळी ऐश्वर्याच्या हट्टामुळे सारंगला देखील या सेमिनारला पाठवण्यात येणार आहे. पण सारंगला आयत्यावेळी विमानाचं तिकीट न मिळाल्यामुळे आता त्याला ट्रेनने बंगळुरूला जावं लागणार आहे. त्याची तयारी देखील झाली आणि आता ती सगळ्यांचा निरोप घेऊन ट्रेनने प्रवासाला निघाला आहे.
मात्र, आता एक वाईट बातमी सगळ्यांच्या कानावर पडणार आहे. सारंग प्रवास करत असलेल्या ट्रेनचा आता अपघात होणार आहे. या अपघातात २०० लोक ठार झाल्याचं देखील कळणार आहे. यात आपला सारंग आहे की, नाही याचा तपास घेण्यसाठी हृषिकेश हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे. त्यावेळी त्याला सारंग सारखीच एका व्यक्तीची डेड बॉडी दिसणार आहे. त्यामुळे तो सारंग गेल्याची बातमी घरी देणार आहे. या धक्क्याने आता सुमित्रा आईला हार्ट अटॅक येणार आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच आजी देखील चक्कर येऊन पडणार आहे.