Gharoghari Matichya Chuli 11 July 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. मात्र, या लग्नाच्या गडबडीत आता रणदिवे कुटुंबावर काही संकटं येताना दिसणार आहेत. आधीच जोगतीणीने जानकीला संकेत दिला होता. त्यात आता तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती येऊन हृषिकेशवर संकट असल्याचे सांगून गेला आहे. तर, देवीने देखील डावा कौल दिल्याने सगळेच चिंतेत पडले आहेत. जानकी देखील आता कोंडीत सापडली आहे. जानकीला हृषिकेश सोबत नानांविषयी महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. मात्र, ऐश्वर्या यात सतत खोडा घालत आहे.
हिम्मतराव काकांना घरी सोडायला गेलेल्या जानकीने त्यांच्या घरातील तो भिंतीवर टांगलेला नानांच्या पहिल्या लग्नाचा फोटो पाहिला होता. त्यामुळे तिच्या मनात विविध प्रश्न उभे राहिले होते. मात्र, त्यावेळी या सगळ्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. मात्र, घरी आल्यावर देखील तिच्या मनात याच गोष्टी होत्या. तिने हृषिकेशला विचारले की, नानांना एखादा भाऊ होता का? यावर हृषिकेशने नाही असे उत्तर देताच जानकीच्या मनातील गोंधळ आणखीनच वाढला आहे. आता पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आणखी एक संकट येणार आहे.
जानकी आणि हृषिकेश यांनी आपल्या लग्नाची पत्रिका आता सगळ्यांना वाटण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी घरात त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आता हृषिकेशच्या घरात मेहंदी सोहळा सुरू होणार आहे. जानकी ही अनाथ होती. ती लहानाची मोठी एका अनाथ आश्रमात झाली होती. त्यामुळे तिला माहेर नाही. यावरूनच आजी तिला टोमणे देते. तर, यामुळे आता जानकीला वाईट वाटणार आहे. जानकीला पुन्हा एकदा आपण अनाथ असल्याची जाणीव होणार आहे. मात्र, याचाच फायदा घेऊन आता ऐश्वर्या एक नवा प्लॅन बनवणार आहे.
जानकी अनाथ असली तरी मी आता तिला एक अशी भेट देणार आहे, ज्यामुळे ती हादरून जाईल, असं म्हणत ऐश्वर्या आपला प्लॅन आजीला सांगते. आता ऐश्वर्या एका व्यक्तीला घरी बोलवणार आहे. मात्र, ही व्यक्ती कोण असणार, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, या व्यक्तीच्या येण्याने रणदिवे कुटुंबात आणि जानकीच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.