'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण आठवड्याच्या शेवटी या शोमध्ये स्पर्धकांनी केलेल्या चुका दाखवण्यासाठी शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुख हजर होतो. आता रितेशची 'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलण्याचे भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असे म्हणत एण्ट्री झाली आहे. त्याच्या भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. दरम्यान रितेशने अंकिता वालावलकरला 'मराठी कार्ड' वापरते म्हणून सुनावले. त्यावर छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरोडेने चांगलेच स्पष्टीकरण दिले आहे.
छोटा पुढारीने अंकिताचा नॉमिनेशचा किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये त्याने डीपी म्हणजेच धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यावर अंकिता त्याच्याकडे पळत गेली होती. तिने 'अरे मराठी माणसाला नॉमिनेट केलं, मराठी माणसाच्या छातीवर पाय देणार, अहो सर मग आम्ही कोण आहेत? मराठी माणूस... अरे मराठी माणसाला पुढे जाऊ द्या... बाहेरच्या, इंग्रजी बोलणाऱ्या मुलीला तुम्ही नॉमिनेट नाही केलं... ' असे म्हटल्याचे सांगितले.
रितेशने छोटा पुढारीच्या वक्तव्यावर अंकिताला काय मत आहे असे विचारले. तेव्हा अंकिताने मला छोटा पुढारी यांनी केलेले नॉमिनेशन पटले नाही असे म्हटले. त्यावर लगेच छोटा पुढारीने उत्तर देत, 'सर, मुद्दा माझा कायपण असू दे. माझा चुकलेला मुद्दा सांगा पण तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना.. मराठी माणसाला पुढे जाऊ द्या..हा डाव आहे' असे म्हटले. तसेच रितेशने देखील त्याचे अगदी बरोबर असल्याचे सांगितले.
पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर हा सेफ झाल्या आहेत. त्यामुळे योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर आणि पुरुषोत्तमदादा पाटील यापैकी कोणत्या स्पर्धकाचा प्रवास आज संपणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एण्ट्री सर्वांनाच चकीत करणारी ठरली. छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.