Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश-ghaath marathi movie jitendra joshi suruchi adarkar starrer film ghaath film getting huge response on box office ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश

Ghaath : अरे हा तर मराठीतला शोले! जितेंद्र जोशी, सुरुची आडारकरचा ‘घात’ चित्रपट पाहून प्रेक्षक झाले खूश

Oct 02, 2024 08:29 PM IST

Ghaath Marathi Movie:‘घात’ हा केवळ एक चित्रपट नसून,एक अनुभव आहे. चित्रपटाची कथा,त्याचे चित्रण,त्यातील प्रत्येक पात्र सगळं इतकं खोलवर जाऊन बसतं की,प्रेक्षकांना स्वतः त्याच जंगलात,त्याच परिस्थितीत असल्यासारखं वाटतं.

Ghaath Marathi Movie
Ghaath Marathi Movie

Ghaath Marathi Movie: बर्लिन फिल्म फेस्टिव्हल गाजवल्यानंतर ‘घात’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन उंची प्रदान केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याचा हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, विदर्भाच्या दुर्गम भागात शूट करण्यात आलेला हा चित्रपट, विदर्भातील कलाकारांच्या अभिनयामुळे अधिकच खास बनला आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. ‘हा तर मराठीतला शोले आहे’, असे प्रेक्षक म्हणत आहेत. तर, काही या चित्रपटाची तुलना हॉलिवूड चित्रपटाशी करत आहेत. 

‘घात’ हा केवळ एक चित्रपट नसून, एक अनुभव आहे. चित्रपटाची कथा, त्याचे चित्रण, त्यातील प्रत्येक पात्र सगळं इतकं खोलवर जाऊन बसतं की, प्रेक्षकांना स्वतः त्याच जंगलात, त्याच परिस्थितीत असल्यासारखं वाटतं. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात उलगडणारी ही कथा, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण करते. विशेष म्हणजे, या चित्रपटातील अनेक कलाकार विदर्भातील आहेत. त्यांनी आपल्या भूमिकांना अत्यंत प्रामाणिकपणे जिवंत केल्या आहेत. या कलाकारांना पाहून प्रेक्षक भारावून जातात आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतात.

गडचिरोलीच्या घनदाट जंगलात झाले चित्रीकरण

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने देखील एक धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात केले. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांच्या या धैर्यामुळे मराठी सिनेमाला एक नवी दिशा मिळाली आहे. ‘घात’ हा केवळ एक मनोरंजन नाही, तर एक प्रेरणादायी चित्रपट आहे. हा चित्रपट दाखवून देतो की, मराठी सिनेमाही जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतो. या चित्रपटाच्या यशाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.

‘या’ कलाकारांचा दमदार अभिनय

'घात' हा सिनेमा माओवादी बंडखोरांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात सामान्य नागरिक, पोलिस आणि बंडखोर यांच्यातील तणावपूर्ण संघर्ष चित्रित केला आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, जनार्दन कदम आणि धनंजय मांडवकर यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर स्थानिक कलाकारांचे देखील लक्षवेधी योगदान आहे. 'घात' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता कलाकर देखील आनंदून गेले आहेत.

Whats_app_banner
विभाग