मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Get Together Trailer: 'देवमाणूस'मधील हा अभिनेता दिसणार "गेट टूगेदर" सिनेमात, पाहा ट्रेलरची

Get Together Trailer: 'देवमाणूस'मधील हा अभिनेता दिसणार "गेट टूगेदर" सिनेमात, पाहा ट्रेलरची

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2023 11:18 AM IST

Devmanus Actor: "गेट टूगेदर" या चित्रपटात पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात देवमाणूस या मालिकेतील अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Get Together Trailer
Get Together Trailer

छोट्या पडदा गाजवणारी मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता या मालिकेतील अभिनेता 'गेट टूगेदर' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

देवमाणूस या मालिकेत एकनाथ गीते याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता तो "गेट टूगेदर" या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.
वाचा: ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना समाजमाध्यमांतून उत्तम प्रतिसादही लाभत आहे.

IPL_Entry_Point

विभाग