आज, २२ जानेवारी रोजी आयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्धाटन सोहळा थाटामाट पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान करण्यात आले. या सोहळ्याला सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण हजर होते. काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री जिनिलिया देशमुखने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जिनिलियाने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर राम मंदिराचा आणि मूर्तीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने "आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. अयोध्येत रामाचे मंदिर झाल्याने संपूर्ण जग आज आनंदी आहे. आमचा राम अयोध्येत येत असताना अब्जावधींचा आवाज असल्याचा मला अभिमान आहे" या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
वाचा: पाऊले चालती अयोध्येची वाट! आलिया-कतरिनासह बॉलिवूड कलाकार अयोध्यला रवाना
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण,रोहित शेट्टी, मनोज जोशी आणि दिपिका चिखलियाया कलाकारांनी हजेरी लावली. तसेच गायक सोनू निगम आणि शंकर महादेवन यांनी या सोहळ्यासाठी खास गाणी गायली आहेत. कलाकारांनी या सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता. त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
मनोरंजन विश्वातील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमारलाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अभिनेता या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजकांना आधीच याची कल्पना दिली होती. आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलेल्या तारखांमुळे तो कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये.
संबंधित बातम्या