मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

Aarti Vilas Borade HT Marathi
May 08, 2024 03:59 PM IST

‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटात बड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात गौतमी पाटील हिंदी गाण्यावर थिरकरणार असल्याचे समोर आले आहे.

गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार
गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

'सबसे कातिल गौतमी पाटील' हे अगदी लहानलहान मुलांच्या तोंडूनही ऐकायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मादक अदा आणि डान्सने वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचे लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसते. आता गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतमी 'द महाराष्ट्र फाइल्स' या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज देखील पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संजीवकुमार राठोड दिग्दर्शित 'द महाराष्ट्र फाइल्स' या चित्रपटात गौतमी पाटील एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. नेहमी पारंपरिक लूकमध्ये दिसणारी गौतमी एका डान्स गर्लची भूमिका साकारणार आहे. ती चित्रपटात एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

८५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट बिग बजेट आहे. या चित्रपटातील एका गाण्यात हिंदी गाण्यावर गौतमी डान्स करणार आहे. तिचा पहिला लूक सर्वांसमोर आला आहे. त्यानंतर ‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट देश आणि जगभरातील ८५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ८५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

कोणते कलाकार दिसणार?

‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटात कलाकरांची फौज पाहायला मिळणार आहे. बडेबडे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे,मंगेश देसाई, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवी धनवे, प्रमोद गायकवाड, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तर या चित्रपटातील गाण्यांना अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर, अमरिश यांनी आवाज दिला आहे.
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

कधी प्रदर्शित होणार प्रदर्शित?

‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटात सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी, सर्व राजकिय पक्षांनी, सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जून पाहावा असे आवाहान निर्मात्यांकडून करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग