'सबसे कातिला गौतमी पाटील' हे अगदी लहान मुलांच्या देखील तोंडून देखील ऐकायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मादक अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात तुफान गर्दी होते. गेल्या काही दिवसांपासून गौतमी ही चित्रपटसृष्टीमध्ये देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता गौतमी छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण गौतमी एखाद्या मालिकेत दिसणार की कार्यक्रमाला हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
गौतमी पाटील ही स्टार प्रवाह वाहिनीवरील रिअॅलिटी शो 'आता होऊ दे धिंगाणा' मध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने सबसे कातील गौतमी पाटीलची एण्ट्री होणार आहे. त्यासोबतच बिग बॉस मराठी ५मधील स्पर्धक धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखील दिसणार आहे. त्यामुळे सर्वजण या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधव करत आहे. त्याचा उत्साह आणि आनंद कार्यक्रमाला चार चाँद लावताना दिसत आहे. आता या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण शंभराव्या भागाच्या खास सेलिब्रेशनमध्ये गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखिल सामील होणार आहेत.
वाचा: चंकी पांडेच्या कानशिलात तर अनिल कपूरला मारण्याची धमकी, एकेकाळी या अभिनेत्रीची होती बॉलिवूडमध्ये दहशत
महाराष्ट्राला लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्जा झाला . या तिसऱ्या पर्वावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करु लागलं. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही आहेत. त्याचसोबत गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखील या पर्वात आहेत.
संबंधित बातम्या