मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: आधी पाठिंबा नंतर वक्तव्यावरुन माघार; चार शब्दात संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

Gautami Patil: आधी पाठिंबा नंतर वक्तव्यावरुन माघार; चार शब्दात संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2023 11:50 AM IST

Sambhaji raje Chhatrapati : सुरुवातीला संभाजी राजे यांनी गौतमी पाटीलला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी “महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असे मला वाटते,” असे म्हटले. यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil
Gautami Patil

गेल्या काही दिवसांपासून लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु होता. राजकीय वर्तुळातील अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. काहींनी गौतमीला पाठिंबा दिला तर काहींनी टीका केली. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सुरुवातीला गौतमीला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी “महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असे मला वाटते,” असे म्हटले. यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गौतमीला संभाजीराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ती म्हणाली की, “खरं तर, मला याबद्दल माहीत नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती घेतल्यावर मी बोलेन. पण, पण दादांच्या बाबतीत नो कॉमेंट्स. दादा काहीही म्हणाले तरी मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. मी त्यांना मानते. बरेच लोक माझा कार्यक्रम बघायला येतात. जर मी अश्लील कृत्य करत असते तर इथे कार्यक्रम करूच शकले नसते.”

संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

गौतमीने पाटील हे आडनाव काढावे का या विषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व सर्वांना दाखविले आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झाले आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी आहे." त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती की “अशा कलेला नको रे बाबा संरक्षण.” आता संभाजीराजेंनी

काय आहे नेमका वाद?

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा ईशा दिला. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.

IPL_Entry_Point

विभाग